Download App

Union Budget 2023 : या बजेटने लोकांचा भ्रमनिरास झाला – जयंत पाटील

  • Written By: Last Updated:

मुंबई : या बजेटने लोकांचा भ्रमनिरास झाला असून महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी या बजेटने काय दिले असा प्रश्न राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी व उपमुख्यमंत्र्यांनी केंद्रसरकारला विचारण्याची आवश्यकता आहे. शेजारी राज्याला मिळाले आमच्या महाराष्ट्राला मिळत नाही याचे शल्य मात्र महाराष्ट्रातील जनतेला कायम राहिल अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त केली आहे.

अर्थसंकल्प आज सर्वांनी पाहिला मागच्या दोन आठवड्यात जे सर्व्हेक्षण या देशाच्या जनतेचे आहे त्यांचे मत या सत्ताधारी पक्षाच्या विरोधात गेले आहे. हे चित्र समोर आल्यानंतरच निवडणूकांवर लक्ष ठेवून आपली घसरलेली लोकप्रियता पुन्हा मिळवण्याचा छोटासा प्रयत्न याठिकाणी निर्मला सीतारामण यांनी केला आहे असा थेट हल्लाबोलही जयंत पाटील यांनी केला.

डिसेंबर महिन्यात बेरोजगारीचा दर ८.३ टक्के गेला आहे. लेबर फोर्स पार्टीसिफेशन जे २०१६ सरकार आल्यानंतर ४७ टक्के होतं ते खाली आलं आहे. या देशातील कोट्यवधी लोकांचा रोजगार गेला आहे. कोरोनानंतरही त्यात सुधारणा करण्यात या सरकारला अपयश आले आहे. जीडीपीचा ग्रोथ रेट ६ वर आहे याची वस्तुस्थिती पाहिली तर आपण ७ टक्क्यांवर पोचलो आहे. निवडणूका होण्याअगोदरचे हे शेवटचे बजेट आहे.पुढच्या वर्षी निवडणूका होतील. नव्या घोषणांकडे लक्ष आहे. पण भारतात आणि सध्या चालू असणार्‍या ८०० योजना आहेत त्यांची प्रगती कुठपर्यंत आली. एका बाजूला महागाई, बेकारी वाढत आहे आणि मग आता निवडणूकाच आहेत म्हणून या सरकारने आता ७ लाख उत्पन्न असणार्‍या नागरिकांना टॅक्स लागणार नाही असा निव्वळ दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे असा आरोपही जयंत पाटील यांनी केला आहे.

Tags

follow us