Download App

पोलिसांनी पैसे घेतले, शाहरूखच्या नातेवाईकांचे गंभीर आरोप अन् निलंबनाची मागणी

Shahrukh Shaikh हा पोलिसांच्या गोळीबारात ठार झालाय. मात्र या प्रकरणामध्ये शाहरूखच्या नातेवाईकांनी पुणे पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.

Police took money, Shahrukh Shaikh relatives make serious allegations and demand suspension : सोलापूरमध्ये एका सराईत गुंडाचा मध्यरात्री एन्काऊंटर झाल्याची (Pune Gangster Encountered) बातमी समोर आली आहे. पुणे पोलिसांनी ही कारवाई केल्याची माहिती मिळत आहे. 23 वर्षीय शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख हा पोलिसांच्या गोळीबारात ठार झालाय. मात्र या प्रकरणामध्ये शाहरूखच्या नातेवाईकांनी पुणे पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.

Air India Plane Crash : 31 मृतदेहांचे डीएनए नमुने जुळले, विजय रुपानी यांच्या मृतदेहाची ओळख पटली

यावेळी बोलताना शाहरूखचे वडील म्हणाले की, पोलिस गेल्या 2-3 महिन्यांपासून शाहरूखच्या मागावर होते. आमची गाडी उचलून नेली होती. तो जरी गुन्हेगार असला तरी तो आता सुधारला आहे. तो व्यवसाय करत होता. मात्र पोलिस केवळ पैशांसाठी अशा कारवाया करतात. जबरदस्तीने गुन्हे दाखल करत चुकीची कलमं लावली. असं त्याचे वडिल म्हणाले.

तुम्ही सगळे माझ्यासोबत आहात ना? सतेज पाटलांची भावनिक साद, दिले मोठे संकेत

तर पत्नीने सांगितले की, शाहरूख घरात झोपलेला होता. पोलिस आल तेव्हा त्यांना मला केसांना धरून बाहेर काढले. माझ्या पतीला पहिले पोलिसांनीच पायात गोळी मारली. त्यानंतर चार गोळ्या झाडून संपवण्यात आलं. तसेच पोलिस आम्हाला त्रास देत असल्यानेच आम्ही राहण्याचं ठिकाण बदललं.तसेच माझ्या पतीने सर्व व्यसन आणि गुन्हेगारी देखील सोडली होती. असं म्हणत शाहरूखच्या कुटुंबाने पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.

दादा भुसे आणि गिरीश महाजन यांना दिलासा! छगन भुजबळांची मोठी घोषणा, नाशिकचं पालकमंत्रीपद…

सोलापुरातील लांबोटीजवळ पुणे गुन्हे शाखेने शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेखचा खात्मा केलाय. तो एक सराईत गुंड असल्याची माहिती मिळत आहे. त्याच्यावर पुणे पोलिसांत अनेक गुन्हे दाखल आहेत. मागील काही दिवसांपासून तो सोलापुरातील लांबोटी (Gangster Encounter) गावाजवळ लपून बसला आहे, अशी माहिती पुणे पोलिसांच्या हाती लागली. त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी पुणे गुन्हे शाखेचे पथक मध्यरात्रीच रवाना झाले अन् लांबोटी येथे पोहोचले.

पोलिसांच्या कारवाईमध्ये शाहरूख गंभीर जखमी

पोलिसांनी शाहरूख लपलेल्या घरामध्ये मोठी छापेमारी केली. त्यावेळी शाहरूखने पोलिसांवर गोळीबार केला, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर या गोळीबाराला प्रत्युत्तर देत असताना पोलिसांच्या कारवाईमध्ये शाहरूख गंभीर जखमी झाला. त्याला त्याच अवस्थेत सोलापुरच्या शासकीय रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. परंतु उपचारावेळी शाहरूखचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय.

15 गंभीर स्वरूपाचे गुन्हे

पोलीस ठाण्यांमधून सुमारे 15 गंभीर स्वरूपाचे गुन्हे शाहरुख शेखवर दाखल आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातील हडपसर, वानवडी, कोंढवा, काळेपडळ या पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई देखील करण्यात आलीय. मकोकाच्या गुन्ह्यातच शाहरूख फरार होता. त्याच्यावर आर्म अक्टचे जवळपास पाच गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळत आहे. पुणे क्राईम ब्रांचचे पथक आणि मोहोळ पोलीस ठाण्याच्या मदतीने ही संयुक्त मोहीम राबवली आहे.

follow us