बारामतीत राष्ट्रवादी अजितपवार पक्षाचा नुकताच मेळावा झाला. यावेळी मेळ्यात सहभागी होण्यासाठी आलेले पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी हॉलसमोर अजितदादांचा श्रद्धांजलीपर लावलेल्या फोटोकडं दुर्लक्ष केल्याचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरलं झाला आहे. त्यावरून पटेल ट्रोल होत आहेत. दरम्यान, त्यांना यावरून विचारलं असता त्यांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही.
आता या प्रकरणावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी एक्स पोस्ट करून पटेलांवर थेट निशाना साधला आहे. पोस्टमध्ये लवांडे म्हणाले, तो व्हिडिओ वारंवार पाहिल्यावर हे स्पष्ट होते की, पटेल तटकर हे जितके भाजपशी बांधील आहेत, तितकेच ते अजितदादांशी बेईमान आहेत, आणि यातून त्यांच्या स्वतंत्र राजकीय महत्त्वाकांक्षा उघड होतात. त्यांची पोकळ भाषणे आणि त्यांच्या मनातील खऱ्या भावना यांमधील तीव्र विरोधाभास या व्हिडिओमध्ये अगदी स्पष्ट दिसतो. आदरणीय अजितदादांच्या निधनाबद्दल त्यांनी व्यक्त केलेले दुःख त्यापैकी किती खरे आणि किती खोटे हे वेळोवेळी स्पष्ट होते.
हा व्हिडिओ पाहून पुन्हा पुन्हा खात्री पटते की पटेल तटकरे जितके #BJPसोबत बांधील आहेत तितके अजितदादांशी एकनिष्ठ नसून स्वतंत्र राजकीय महत्वाकांक्षी होते. त्यांची पोकळ भाषणे आणि त्यांच्या अंतर्मनात असलेला भाव यात किती फरक असतो हे या व्हिडिओमधून स्पष्ट होत आहे.
आदरणीय अजितदादा… https://t.co/uMGS71apjo— Vikas Lawande (@VikasLawande1) April 8, 2026
