समर्थ क्रॉप केअरच्या प्रशांत गवळीवर गुंतवणूकदार करणार गुन्हा दाखल; गुंतवणूकदारांची 5 हजार कोटींची फसवणूक

समर्थ क्रॉप केअर कंपनीच्या माध्यमातून प्रशांत गवळी याच्याकडून गुंतवणूकदारांची 5 हजार कोटींची फसवणूक. प्रशांत गवळी पसार.

Untitled Design (74)

Untitled Design (74)

Prashant Gawli cheats investors of Rs 5,000 crores : पुण्यासह राज्यातील 12 पेक्षा अधिक जिल्ह्यातल्या 45 हजार अधिक गुंतवणूकदारांना 7 संचालकांनी मिळून 4 ते 5 हजार कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. या टोळीचा सरदार म्हणजे प्रशांत गवळी(Prashant Gavali). ज्याच्यावर याआधी देखील फसवणुकीचे (Fraud) बरेच गुन्हे दाखल आहेत. गेल्या जुलै महिन्यात या ठगाला अटक देखील करण्यात आली होती. बनावट कृषी अधिकारी असल्याचं भासवल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. आता पोलीस (Police) त्याचा पुन्हा शोध घेत आहेत. कारण दाम दुप्पट आणि आकर्षक परतावा देण्याचं आमिष दाखवत राज्यातल्या 45 हजार गुंतवणूकदारांचे पैसे घेत प्रशांत गवळीसह 7 संचालकांनी धूम ठोकलीय. हे सगळे सध्या फरार आहेत.

समर्थ क्रॉप केअर (Samarth Crop Care) या कंपनीचा संस्थापक प्रशांत गवळी आणि त्याचे साथीदार असलेले आणि याच कंपनीचे संचालक सुदामा दास, प्रकाश राठोड, ज्योतिबा काटकर, प्रशांत मांगने, नवनाथ जाधव, ओंकार कदम आणि चंद्रकांत राऊत हे सर्वजण आर्थिक घोटाळा करून पसार झाले आहेत. गवळी आणि त्याचे साथीदार यांच्याशी सध्या कोणताच संपर्क होऊ शकत नाहीये. त्यामुळे पुण्यासह राज्यातल्या 12 जिल्ह्यातल्या 45 हजारांहून अधिक गुंतवणूकदारांची 5 हजार कोटी रुपयांची फसवणूक करून ही टोळी पसार झाली आहे. प्रशांत गवळी याने दिलेला तिसरा वायदा देखील हवेत विरल्यानं आता गुंतवणूकदार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहेत.

सरकारची पीकविमा योजना चालली कुणीकडं?, शेतकऱ्यांना शून्य लाभ, धक्कादायक माहिती समोर

शेतमाल एक्स्पोर्ट करण्याच्या नावाखाली समर्थ क्रॉप केअर कंपनीने राज्यातल्या अनेक जिल्ह्यातल्या गुंतवणूकदारांना प्रति महिना 10 टक्के परतावा आणि वर्षभरात दाम दुप्पट करण्याचं आमिष दाखवलं होतं. या फसव्या योजनेच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना तब्बल 4 ते 5 हजार कोटींचा चुना त्यांनी लावलाय. मात्र मागच्या 5 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना या ठगांनी एक दमडीचाही परतावा दिलेला नाही. जेव्हा ही गोष्ट गुंतवणूकदारांच्या लक्षात आली, तेव्हा त्याने डॅमेज कंट्रोल करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात एका मंगल कार्यालयात गुंतवणूकदारांचा मेळावा घेतला. सध्या आर्थिक अडचणी आहेत. मात्र त्या तात्पुरत्या स्वरूपाच्या आहेत. कंपनी सर्व गुंतवणूकदारांचे पैसे परताव्यासह परत करेल. कोणाचाही पैसा बुडणार नाही. फक्त मला थोडा वेळ द्या. अफवांवर विश्वास ठेऊ नका. मी कुठेही असलो तरी तुमच्या खात्यात पैसे येतील, असं फसवं आश्वासन देऊन त्यानं वेळ मारून नेली.

त्यानंतर देखील बऱ्याच वेळेस त्याने पैसे देतो म्हणून वायदे दिले. मात्र त्याने दिलेला तिसरा वायदा देखील तो पूर्ण करू न शकल्याने गुंतवणूकदार संतप्त झाले आहेत. परतावा मिळाला नसल्याने आता गुंतवणूकदारांनी गुन्हा दाखल करण्याची तयारी केली आहे.

Exit mobile version