Prithviraj Chavan : निवडणूक आयोग आणि सरकारने निकालाबाबत जनतेला विश्वास देणे गरजेचे आहे. (Prithviraj Chavan) परंतु ते जनतेला गृहीत धरत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत निवडणूक आयोग आणि सरकारची दडपशाही ब्रिटिशांपेक्षाही वाईट आहे. निवडणूक निकाल आणि प्रक्रियेबाबत लोकांचा गैरसमज होईल, असं वर्तन निवडणूक आयोगाकडून होता कामा नये असं मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळच्या निवडणूक निकाल हा अनपेक्षित होता. त्यामुळे अनेक प्रश्न लोकांच्या मनात उपस्थित झाले आहेत. लोकसभेच्या निवडणुकीनंतर एवढा बदल कशामुळे झाला. सत्ताधारी पक्ष जी कारणे सांगत आहे, खरंच ती कारणे होती काय? याबाबतचे विश्लेषण सध्या सुरू आहे. पराभवानंतर आत्मपरीक्षण आणि विश्लेषण करावीच लागतात. लोकांच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले आहेत. हे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी निवडणूक आयोग आणि सरकारची आहे. लोकांच्या मनात निवडणूक प्रक्रियेबाबत गैरसमज होऊन त्यांचा निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास उडाला तर देशात लोकशाहीच राहणार नाही असंही चव्हाण म्हणाले आहेत.
पृथ्वीराज चव्हाणांना धक्का देणारे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, हॅक हा तांत्रिक मुद्दा आहे. हॅक म्हणजे मतदान झाले. मतदान यंत्र सील केले आणि बाहेरून ऑपरेट केले असे होऊ शकत नाही. जे मतदान यंत्र वापरण्यात आले त्याच्या सॉफ्टवेअरमध्ये काही दोष आहेत का, हे तपासायला हवे. लोकांच्या प्रश्नांचे निरसन करण्यासाठी निवडणूक आयोगाने व्हीव्हीपॅटच्या सर्व चिठ्ठ्या मोजाव्यात. ज्यांना शंका आहे त्या उमेदवारांनी मतमोजणीचे पैसे भरावेत असंही ते यावेळी म्हणाले आहेत.
न्यायालयाची आणि पोलिसांची भीती दाखवून तुम्ही लोकांचा विचार दडपू शकत नाही. पारदर्शक आणि निर्भय वातावरण निवडणूक प्रक्रिया राबविणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्यच आहे. आताच्या प्रक्रियेत जे लोक निवडून आले त्यांनीही या प्रक्रियेविषयी नाराजी व्यक्त केली आहे. आत्ताच्या प्रक्रियेबाबत अनेक लोक मत व्यक्त करत आहेत. आम्ही तर या पुढच्या निवडणुका मतपत्रिकेवरच घ्याव्यात, यासाठी देशव्यापी आंदोलन सुरू करत आहोत. त्यासाठी स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे