Download App

बांग्लादेशात हिंदूवर अत्याचार; अहिल्यानगर अन् संगमनेरमध्ये निदर्शने, राज्यभरात संतापाची लाट

  • Written By: Last Updated:

Protest Against Bangladesh Violence On Hindu : बांगलादेशात हिंदूंवर होणारे अत्याचार आणि मंदिरे पाडल्याबद्दल हिंदू समाजात प्रचंड संताप आहे. बांग्लादेशातील (Protest In Ahilyanagar) अल्पसंख्यांक हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आता भारतातही निदर्शने होत आहेत. याविरोधात महाराष्ट्र् राज्यात देखील तणावाचं वातावरण आहे. अहिल्यानगर आणि संगमनेर शहरात देखील या घटनेच्या (Bangladesh Violence) निषेधार्थ हिंदू समाज आक्रमक आहे.

शरद पवार जन्म १०० शकुनी मेल्यावर झालाय; भाजप आमदार पडळकरांची पवारांवर घणाघाती टीका

बांग्लादेशात हिंदूंवर होत असलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ आज 10 डिसेंबर रोजी अहिल्यानगर शहरात सकल हिंदू समाजातर्फे (Bangladesh Violence On Hindu) बाईक रॅलीचे आयोजन करण्यात (Ahilyanagar News) आले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या रॅलीला सुरुवात झालीय. अहिल्यानगर शहरात बांग्लादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात हिंदू समाज एकवटला आहे.

मामांची हत्या…योगेश टिळेकरांची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाले, पोलीस यंत्रणा…

बांग्लादेशमध्ये हिंदू बांधवांवर अत्याचार होत आहेत. हे अत्याचार थांबवण्यासाठी भारत सरकारने तातडीने राजनैतिक हस्तक्षेप करून बांग्लादेशमधील हिंदू बांधवांना दिलासा द्यावा, यासाठी संगमनेर तालुक्यातील समस्त हिंदू बांधवांनी मोर्चा (Sangamner News) काढला. नगरपालिका येथून निघालेला मोर्चा प्रांत कार्यालवर येऊन धडकला. यावेळी आमदार अमोल खताळ यांच्यासह आमदार सत्यजित तांबे, जयश्री थोरात यांसह हजारो हिंदू बांधव हजर होते.

बांग्लादेशमधील हिंदूंवर गेल्या काही दिवसांपासून अत्याचार सुरू आहे. सनातन धर्माविरूध्दच्या कथित कटाचा भाग म्हणून जाणीवपुर्वक मंदिरे आणि हिंदूंना लक्ष्य केले जात असल्याचे नमुद करून खा. नीलेश लंके यांनी हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध केलाय. बांग्लादेशातील अध्यात्मिक गुरू चिन्मय कृष्णदास यांना नुकतीच अटक करून त्यांना तुरूंगात डांबण्यात आलंय. बांग्लादेशमध्ये मानवतेच्या मर्यादा ओलांडल्या जात आहेत.

जगामध्ये कोठेही हिंदू धर्मीय किंवा अल्पसंख्यांक धर्मियांवर होणारा अत्याचार हा अत्यंत चुकीचा आहे. मानवता धर्म जोपासण्यासाठी महाराष्ट्र आणि भारत सरकारने यासाठी तातडीने पावले उचलून बांगलादेशमधील हिंदू धमयांना दिलासा द्यावा, अशी मागणी सर्व स्तरांवरून होत असल्याचं दिसतंय.

 

follow us