Annis on Indurikar Maharaj : किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर (Nivrutti Kashinath Deshmukh ) यांच्या अडचणीत सातत्यानं वाढ होताना दिसत आहे. महाराजांनी लिंगनिदान (Gender diagnosis) दाव्यासंबंधी अशास्त्रीय व बेकायदेशीर वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांच्यावर संगमनेर (Sangamner)येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी (First Class Magistrate)यांच्या कोर्टात सुरू असलेला खटला चालू ठेवण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने नुकतेच दिले. खटला रद्द करण्याचा जिल्हा न्यायालयाचा आदेश रद्द ठरविला आहे. तसेच, इंदुरीकर महाराजांना त्यांच्या मागणीनुसार पुढील अपील करण्यासाठी उच्च न्यायालयाने चार आठवड्यांची मुदत दिली आहे. त्यामुळे या काळात ते औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश किशोर संत यांच्या निकालाला आव्हान देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. त्याआधीच सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (महा.अंनिस) वतीने खबरदारी म्हणून सावधानपत्र (कॅव्हेट) दाखल करणार असल्याचे महा.अंनिसचे अध्यक्ष अविनाश पाटील (Avinash Patil)यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
‘जयंत पाटील भाजपच्या वाटेवर, त्यांचं ‘तेव्हाचं’ रडणं नाटकी’; शिंदे गटाच्या आमदाराचा खळबळजनक दावा
यावेळी जेष्ठ सहकारी कॉम्रेड बाबा अरगडे, अॅड.रंजना गवांदे-पगार, विशाल विमल आदी उपस्थित होते. इंदोरीकर महाराज यांची सततची महिलंसंबंधी अपमानजनक वक्तव्य आणि गर्भलिंग निदानासंबंधीचा दावा हा स्त्रियांना दुय्यमत्व देणारा, पुरुषी व्यवस्थेला खतपाणी घालणारा आणि समर्थन देणारा असल्यामुळे यासंबंधीचा खटला सुरु ठेवण्याचा न्यायालयाचा आदेश हा महाराष्ट्रातील स्त्रीभ्रूणहत्येला पोषक स्वरुपाचे वर्तन व्यवहार करणाऱ्या सर्वांनाच चपराक देणारा आहे. त्या अर्थाने तो स्त्रियांच्या जन्माच्या अधिकाराला विश्वास आणि स्वातंत्र्य देणारा आदेश असल्याचेही अविनाश पाटील यांनी सांगितले.
आता निवडणुका झाल्यास कोण जिंकणार? राष्ट्रवादीने थेट आकडाच सांगितला
इंदोरीकर महाराजांनी केलेल्या वक्तव्याबद्दल आणि ते सातत्याने स्त्रीयांसंबंधी अपमानित वक्तव्य करत असतात. त्यामुळे त्यांच्यावर पीसीपीएनडीटी कायद्यानुसार कारवाई होऊन त्यांना दोन वर्षे सश्रम करावासाची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी महा. अंनिसची आहे, असेही यावेळी सांगितले.
सम आणि विषम तारखेला स्त्रीशी संग केला तर अनुक्रमे मुलगा व मुलगी होते, असे अशास्त्रीय व बेकायदेशीर वक्तव्य इंदुरीकर महाराज यांनी संगमनेर, शेलद (ता.अकोले), उरण (जि.रायगड), बीड याठिकाणी जाहीरपणे केले होते. त्यासंबंधीचे व्हिडीओ युट्युबवर अपलोड केले गेले होते. सदर आक्षेपार्ह वक्तव्यामुळे झालेल्या महिलांच्या मानहानीबाबत आणि गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक (पीसीपीएनडीटी) कायद्याच्या उल्लंघनाबाबत महा. अंनिसने अहमदनगर जिल्हा शल्यचिकित्सकांकडे 17 फेब्रुवारी 2020 रोजी तक्रार अर्ज दाखल केला होता.
दरम्यानच्या काळात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील आणि जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कार्यवाहीतील पीसीपीएनडीटी कायदा अंमलबजावणीची जबाबदारी असणाऱ्या समितीच्यावतीने सदर प्रकरणात इंदुरीकर महाराजांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी कुठलेही पुरावे उपलब्ध नाहीत, अशा प्रकारचा निर्णय घेतला होता.
पोलिसांच्या सायबर शाखेकडून आलेल्या नकारात्मक अहवालाच्या पार्श्वभूमीवर अॅड. रंजना गवांदे यांनी आक्षेपार्ह वक्तव्यांच्या संबंधातील पुरावे जिल्हा शल्यचिकित्सांकडे सादर केले. त्याच्या आधारावर जिल्हा शल्यचिकित्सकांकडून इंदुरीकर महाराजांना नोटीस बजावण्यात आली. त्याला वकिलांमार्फत उत्तर देताना सुरुवातीला जाहीरपणे असे सांगण्यात आले की, मी असे काही वक्तव्य केलेच नाही. पुढे 18 फेब्रुवारी 2020 रोजी इंदुरीकर महाराजांनी जाहीर माफीनामा प्रसिद्धीला दिला.