पुण्यात MPSC विद्यार्थ्याने जीवन संपवलं; ‘त्याच्यावर ही वेळ का आली?’ दिपकेंचा सरकारला सवाल

Abhijeet Dipke पुण्यात MPSC विद्यार्थ्याने जीवन संपवले असून अभिजीत दिपकेंनी प्रतिक्रिया देत, विद्यार्थ्यांवर अशी वेळ का आली, असा सवाल केला.

Pune MPSC Student Death

पुण्यात MPSC विद्यार्थ्याने जीवन संपवले, अभिजीत दिपके यांनी प्रतिक्रिया देत, विद्यार्थ्यांवर अशी वेळ का आली, असा सवाल उपस्थित केला.

Abhijeet Dipke Reacts to Pune MPSC Student Death: राज्यात कथित एमपीएससी (MPSC) पेपरफुटीनंतर विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. एमपीएससीमध्ये होणाऱ्या गैरप्रकारामुळे परिक्षार्थ्यांमध्ये नैराश्याचे वातावरण आहे. अशातच या गैरप्रकाराला कंटाळून पुण्यात एमपीएससीच्या एका परिक्षार्थ्यांने आपले जीवन संपवले आहे. या दुर्दैवी घटनेवर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके (Abhijeet Dipke) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

‘केअरटेकरने आपली जागा घेतली अशी भीती पालकांनी बाळगू नये’; ‘अडकित्ता’च्या निमित्ताने खास संवाद

प्रथमेश देशमुख (Prathamesh Deshmukh) या 25 वर्षीय तरुणाने एमपीएससीच्या परिक्षेत होणाऱ्या गैरप्रकाराला कंटाळून आपले जीवन संपवले. प्रथमेश हा धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील राहिवासी आहे. दोन वर्षांपासून तो पुण्यात स्पर्धा परिक्षांची तयारी करायचा. परिक्षेची तयारी करत असताना राहत्या खोलीचे भाडे थकल्यामुळे त्यावर कर्जही झाले होते. त्यातच एमपीएससीचा पेपर फुटल्यामुळे तो नैराश्यात गेला आणि त्याने आपले जीवन संपवले, अशी माहिती समोर आली आहे.

अभिजीत दिपके काय म्हणाले

प्रथमेश देशमुखला हे पाऊल का उचलावे लागले याचा सरकारने विचार केला पाहिजे. प्रथमेश धाराशिव सारख्या भागातून पुण्याला स्वप्न घेऊन येतो. जेव्हा तो पुण्यात आला असेल आणि त्याला वाटलं असेल की, आपण एमपीएससीची परिक्षा देऊन मोठा अधिकारी बनू आणि सरकारची सेवा करु, पण झालं काय ? ज्या सरकाराची तो सेवा करु पाहत होता. त्याच सरकारच्या गैरकारभारामुळे त्याला आपले जीवन संपवावे लागले, असे दिपके म्हणाले.

तसेच, प्रथमेश आज आपल्यात नाही, पण त्याच्यासाठी न्यायाची लढाई आता आपल्या सगळ्यांना मिळून लढायची आहे.

महाराष्ट्रातील हजारो MPSC परीक्षार्थी अत्यंत सामान्य आणि कष्टकरी कुटुंबांतून येतात. अनेक जण छोट्या शहरांतून आणि दुर्गम गावांतून आपल्या कुटुंबाच्या अपेक्षा आणि राज्याची सेवा करण्याचं स्वप्न घेऊन पुण्यासारख्या शहरात येतात.

या परीक्षेची तयारी करताना ते आयुष्यातली अनेक वर्षं खर्च करतात. घरापासून दूर राहून, अत्यंत मर्यादित पैशांत भाडं, जेवण, पुस्तकं, क्लासेस आणि परीक्षेचा खर्च भागवतात. अनेक कुटुंबं आपल्या मुलांच्या भविष्यासाठी स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून हा खर्च उचलतात.

जसे तुम्हाला समर्थक तसे आमच्या नेत्यांनाही समर्थक; मनोज जरांगे पाटलांच्या इशाऱ्यावर सामंतांचा पलटवार

आणि त्यातच परीक्षांमधील अनियमितता, वारंवार होणारा विलंब, अनिश्चितता आणि व्यवस्थेतील उत्तरदायित्वाचा अभाव विद्यार्थ्यांवरील मानसिक आणि आर्थिक ताण आणखी वाढवतो. आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील विद्यार्थ्यासाठी परीक्षेचा प्रत्येक विलंब म्हणजे फक्त पुढे गेलेली तारीख नसते. त्याचा अर्थ आणखी काही महिन्यांचं भाडं, आणखी खर्च, कुटुंबावर आणखी आर्थिक भार आणि आयुष्यातलं आणखी एक वर्ष अनिश्चिततेत जाणं असते.

ज्या परीक्षा व्यवस्थेवर विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवायचा, त्याच व्यवस्थेतील अपयशाची इतकी मोठी किंमत विद्यार्थ्यांनी का मोजायची?

एकनाथ शिंदे तुम्ही शहाणे व्हा, अन्यथा संपणार..मनोज जरांगे यांचा खुलेआम इशारा

आणखी किती काळ विद्यार्थ्यांना असंच सहन करावं लागणार? आणखी किती प्रथमेश गेल्यानंतर या व्यवस्थेला जाग येणार आणि जबाबदार लोकांची जबाबदारी निश्चित होणार? असे मत अभिजीत दिपकेंनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून मांडले आहे.

Exit mobile version