पुनित बालन समूहाची इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगच्या तिसऱ्या हंगामात दमदार एन्ट्री

“तरुणांना प्रेरणा देण्यासाठी आणि मजबूत क्रीडा समुदाय उभारण्यासाठी खेळ हे प्रभावी माध्यम आहे.

News Photo   2026 07 13T152554.576

पुनित बालन समूहाची इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगच्या तिसऱ्या हंगामात दमदार एन्ट्री

भारतातील प्रमुख सुपरक्रॉस स्पर्धा असलेल्या (Balan) इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग (ISRL) ने तिसऱ्या हंगामासाठी प्रसिद्ध उद्योगपती आणि क्रीडाप्रेमी पुनित बालन समूह (PBG) यांचे नवीन फ्रँचायझी म्हणून स्वागत केले आहे. या सहभागामुळे भारतीय मोटरस्पोर्ट्स क्षेत्राला नवी चालना मिळणार असून लीगच्या विस्तारालाही मोठे बळ मिळणार आहे.

पुनित बालन समूहाने यापूर्वी क्रिकेट, बुद्धिबळ, टेनिस, हँडबॉल, टेबल टेनिस, खो-खो, बॅडमिंटन आणि आर्म रेसलिंगसारख्या विविध क्रीडा प्रकारांत गुंतवणूक आणि मालकी हक्काद्वारे महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. आता ISRL मधील प्रवेशामुळे भारतीय मोटरस्पोर्ट्स क्षेत्रातही समूहाने पाऊल ठेवले आहे. यामुळे महाराष्ट्र, विशेषतः पुणे, हे मोटरस्पोर्ट्सचे उदयोन्मुख केंद्र म्हणून अधिक ठळकपणे समोर येणार असल्याचे मानले जात आहे.

पुनीत बालन ग्रुप’कडून आषाढी वारीतील पोलिसांना ९ हजार जीवनावश्यक वस्तूंचे किट

पुनित बालन समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पुनित बालन यांनी, “तरुणांना प्रेरणा देण्यासाठी आणि मजबूत क्रीडा समुदाय उभारण्यासाठी खेळ हे प्रभावी माध्यम आहे. ISRL भारतातील रेसिंग क्षेत्रातील रोमांचक नवे पर्व आहे. या लीगच्या माध्यमातून भारतीय रेसिंगमधील गुणवत्ता, स्पर्धात्मकता आणि चाहत्यांचा उत्साह अधिक वाढेल. देशातील मोटरस्पोर्ट्सच्या दीर्घकालीन विकासासाठी आम्ही सक्रिय योगदान देण्यास कटिबद्ध आहोत,” असे सांगितले.

ISRL चे सह-संस्थापक आणि संचालक ईशान लोखंडे यांनी पुनित बालन समूहाच्या सहभागाचे स्वागत करताना, भारतीय खेळाडूंच्या विकासासाठी समूहाची असलेली बांधिलकी आणि जागतिक दर्जाची क्रीडा परिसंस्था उभारण्याची दूरदृष्टी लीगच्या वाढीसाठी महत्त्वाची ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. त्यांच्या मते, नव्या फ्रँचायझीमुळे रेसिंग क्षेत्रात नवचैतन्य निर्माण होईल आणि लीगच्या लोकप्रियतेत आणखी भर पडेल.

क्रीडा, मनोरंजन, युवा संस्कृती आणि व्यवसाय यांचा संगम साधणारी ISRL ही भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या मोटरस्पोर्ट्स लीगपैकी एक मानली जाते. तिसरा हंगाम अधिक भव्य, वेगवान आणि प्रेक्षकांसाठी रोमांचक ठरणार असून उच्च दर्जाच्या स्पर्धांसह चाहत्यांना अविस्मरणीय अनुभव देण्याची लीगची तयारी सुरू आहे.

Exit mobile version