बोलताना भान ठेवा; जरांगेंच्या ऑडिओ क्लिपवरून विखेंनी रामदास कदमांना सुनावले

Radhakrishan Vikhe on Ramdas kadam 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवरून विखे पाटलांनी रामदास कदमांना कडक शब्दांत सुनावले आहे.

Radhakrishan Vikhe On Ramdas Kadam

Radhakrishan Vikhe On Ramdas Kadam

Radhakrishan Vikhe on Shivsena Ramdas kadam for Jarange Audio Clip : 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवरून (Patil) महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ही क्लिप सार्वजनिक केल्यानंतर भाजप आणि शिवसेनेतील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या प्रकरणात आता मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी रामदास कदमांना कडक शब्दांत सुनावले आहे.

नेमकं काय म्हणाले राधाकृष्ण विखे पाटील?

मनोज जरांगे पाटील यांनी ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी भाजपवर निशाणा साधला त्यावर बोलताना मंत्री राधाकृष्ण विखेंनी सांगितले की रामदास कदम यांनी बोलताना भान ठेवलं पाहिजे होतं. खरंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी 14 ते 19 या कालावधीत मराठा समाजाला जे आरक्षण दिले खरंतर ते कोर्टामध्ये टिकला आहे मात्र त्याचा वाटोळ महाविकास आघाडीने केलं त्यानंतर पुन्हा आरक्षणासाठी प्रयत्न झाले आणि पाच एक हजार मुलांना शिंदे साहेबांच्या काळात न्याय मिळाला हे सगळं समन्वयातून चालू असताना क्लिप च्या संदर्भात कोणीतरी खोडसाळपणा केला आहे त्यामुळे त्यातली ची चौकशी होईपर्यंत महायुतीमध्ये आरोप-प्रत्यारोप चालू आहे ते थांबले पाहिजे. अशा शब्दांत विखे यांनी रामदास कदमांना सुनावले आहे.

वाहतुकीचा बोजा पोलिसांवरच का?, राज ठाकरेंनी शहरांच्या नियोजनावरही ओढले ताशेरे

दरम्यान, भाजप आमदार प्रसाद लाड यांनी या प्रकरणावरून शिवसेना आणि भाजपमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. या कथित षड्यंत्राची पोलीस विशेष तपास पथक अर्थात एसआयटीमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची चौकशी करण्याची गरज असल्याचं लाड म्हणाले. ऑडिओ क्लिपमधील 500 कोटींच्या दाव्याचं भाजपने कधीही खंडन केलेलं नसून क्लिपची फॉरेन्सिक तपासणी केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं.

Exit mobile version