Download App

Radhakrishna Vikhe Patil यांच्यावर उधळला भंडारा; सोलापूर शासकीय विश्रामगृहात घडला प्रकार

  • Written By: Last Updated:

Radhakrishna Vikhe Patil : सोलापूरमध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil ) यांच्या अंगावर थेट भंडारा उधळल्याची घटना घडली आहे. शासकीय विश्रामगृहात हा प्रकार घडला आहे. धरगर आरक्षण कृती समितीच्या वतीने हा भंडारा उधळण्यात आला आहे. त्यावेळी धरगर आरक्षण किती दिवस प्रलंबित ठेवणार? असा सवाल करत हा प्रकार घडला आहे.

Mission Raniganj Teaser: ‘मिशन राणीगंज’चा टीझर प्रदर्शित, ‘या’ एका सीनवर चाहते म्हणाले…

नेमका प्रकार काय घडला?

सोलापूरचे पालकमंत्री असलेले मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे सोलपूरमध्ये गेले असताना ते लोकांचे निवेदनं स्विकारत होते. त्यांच्यासोबत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. ते शासकीय विश्रामगृहात असताना तेथे धनगर आरक्षण कृती समितीच्या काही लोकांनी त्यांची भेट घेतली. त्यांना धनगर आरक्षणासाठी निवेदन त्यावेळी तेथे त्यातील एकाने मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर थेट भंडारा उधळला. धनगर आरक्षणाचा प्रश्न कित्येक दिवस प्रलंबित असल्याने हा भंडारा उधळून संताप व्यक्त करण्यात आला.

लोक मांसाहारी झाल्यानेच हिमाचलात ढगफुटी; IIT मंडी संचालकांचं अजब विधान

यावेळी शासकीय विश्रामगृहात घोषणा देखील देण्यात आल्या. या सदस्यांना विखे यांच्या अंगरक्षकांनी आणि पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न करत विश्रामगृहाच्या बाहेर काढले.

काय म्हणाले धरगर आरक्षण कृती समिती सदस्य?

शासनानने धनगर समाजाच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावं यासाठी आम्ही सोलापूरमध्ये पालकमंत्री मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदन देण्यासाठी गेलो होतो. यावेळी आम्ही धनगर समाजाला एसटी आरक्षण द्यावं आणि ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागू नये. अशी मागणी केली. तसेच यापुढे आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही तर आम्ही मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना काळ देखील फासण्यात येईल असा इशारा यावेळी धनगर आरक्षण कृती समितीच्या सदस्यांनी दिला आहे.

Tags

follow us