कोल्हापूर : भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींचा (Rahul Gandhi) साधेपणा आपल्यापैकी सर्वांनी बघितला आहे. त्यांच्या यासाधेपणाने सर्वांचेच लक्ष वेधले होते. त्यानंतर आज (दि.5) पुन्हा याच साधेपणाची पुनरावृत्ती झाली असून, राहुल गांधींनी एका साध्या टेम्पो चालकाच्या घरात स्वतः स्वयंपाक बनवत त्यांच्यासोबत संवाद साधला आहे. ऐन विधानसभेच्या तोंडावर राहुल गांधींनी कोल्हापुरात एका सर्वसाधारण टेम्पो चालकाच्या घरी भेट दिल्याने कोल्हापुरातील वारं फिरणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. (Rahul Gandhi Kolhapur Visit)
“..म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला”, राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल!
नेमकं काय घडलं?
राज्यात लवकरचं विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा होणार असून, आज (दि.5) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. मोदी वाशिमच्या तर, राहुल गांधी कोल्हापुरमध्ये आहेत. राहुल गांधीच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण केलं जाणार आहे.
अनावरणापूर्वी राहुल गांधी टेम्पोचालकाच्या घरी
काँग्रेस नेते राहुल गांधी कोल्हापुरात पोहचल्यानंतर त्यांच्या दौऱ्यात अचानक बदल झाला. त्यामुळे एकच गोंधळ झाला. राहुल गांधी कोल्हापुरात दाखल झाल्यानंतर कार्यक्रमस्थळी न जाता उचगावमधील टेम्पो चालक आणि काँग्रेस कार्यकर्ता असलेल्या अजित संधे घरी भेट दिली. या ठिकाणी त्यांनी कार्यकर्त्याच्या घरी सुमारे 45 मिनिटे गप्पा मारल्या. एवढेच नव्हे तर, संबंधित कुटुंबियांसाठी स्वतःच्या हाताने मराठमोळे पदार्थ बनवून खाऊ घातले.
Video : अजित पवार बाहेर पडणार?; महायुतीतील राजकीय भूकंपावर पंकजांनी सांगितली ‘अंदर की बात’
स्वतःच्या हाताने बनवले मराठमोळे पदार्थ
राहुल गांधीच्या भेटीनंतर आपल्याला अत्यानंद झाल्याचे संधे यांनी सांगितले. तर, त्यांच्या पत्नीने सांगितले की, राहुल गांधींनी आमच्या घरी भेट दिली यात आनंद तर आहेच पण, सर्वाधिक आनंद त्यांनी त्यांच्या हाताने बनवलेले पदार्थ आम्हाला खाऊ घातले आणि स्वतःदेखील खाल्ले. राहुल गांधींनी काय बनवले असे विचारले असता संधे यांच्या पत्नीने सांगितले की, त्यांनी वांग्याची, हरभऱ्याची आणि कांद्याची पात बनवली. हे सर्व बनवता आमच्या किचना संपूर्ण ताबा राहुल गांधी यांच्याच हातात होता असे त्या म्हणाल्या.
तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कुनाची… पर्वा बी कुनाची…
कोल्हापुरातल्या उचगावमध्ये टेम्पोचालक अजित संधे आणि त्यांच्या कुटुंबियांशी राहुलजींनी संवाद साधला.#RahulGandhi #Maharashtra #Kolhapur pic.twitter.com/WtYpGmsS98
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) October 5, 2024