देशात दरवर्षी 4.50 लाख स्त्रीभ्रूण हत्या; ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमात राहुल गांधी नेमकं काय म्हणाले?

Chhatron Ki Gunj In Pune : लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून पुण्यात छात्रों की गुंज या कार्यक्रमाच्या माध्यमातून

Chhatron Ki Gunj In Pune

Chhatron Ki Gunj In Pune

Chhatron Ki Gunj In Pune : लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून पुण्यात छात्रों की गुंज या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी चर्चा करत आहे. या कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी महिलांच्या अडीअडचणी जाणून घेत महिला कधीच स्वतंत्र्य राहू नयेत हा मनुस्मृतीचा डाव आहे असं म्हटलं आहे.

या कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी म्हणाले की, मी या कार्यक्रमात राजकारणावर काहीच बोलणार नाही. या कार्यक्रमाला मुलींची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. महिला ही देशाची सर्वात मोठी ताकद आहे. देशात दरवर्षी 4.50 लाख स्त्रीभ्रूण हत्या होत आहे. 100 पैकी सहा महिलांवर बलात्कार होतो. आज शिक्षणातही महिलांसोबत भेदभाव सुरु आहे. महिलांच्या पदवीपेक्षा पुरुषांची पदवी श्रेष्ठ मानली जातेय आर्थिक हिंसाचारालाही महिलांना तोंड द्यावं लागतं असं या कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी म्हणाले. तर दुसरीकडे या कार्यक्रमात पुण्यातील विविध भागातून आलेल्या विद्यार्थिनींनी मन मोकळे करत आपल्या अडचणी राहुल गांधी यांच्यासमोर मांडल्या.

Exit mobile version