आज राहुरी अन् बारामती पोटनिवडणुकीसाठी मतदान! सुनेत्रा पवार अजितदादांच्या स्मृतीस्थळी तर कर्डिलेंनी केलं मतदान

Rahuri and Baramati by-elections राज्यामध्ये आज राहुरी आणि बारामती या पोटनिवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

Rahuri And Baramati By Elections

Rahuri And Baramati By Elections

Rahuri and Baramati by-elections Voting Sunetra Pawar at Ajitdada’s memorial, Kardile casts vote : राज्यामध्ये आज राहुरी आणि बारामती या पोटनिवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि उमेदवार सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या स्मृतिस्थळाला भेट देत काटेवाडी या त्यांच्या गावी मतदानासाठी रवाना झाल्या. तर दुसरीकडे राहुरी पोटनिवडणुकीतील उमेदवार अक्षय कर्डिले यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.

इथेनॉल आधारित अर्थव्यवस्थेकडे भारताची झेप, नितीन गडकरी यांचे संकेत, भारत 100% इंधन ब्लेंडिंगकडे?

दरम्यान राज्यामध्ये आज 23 एप्रिल 2026 रोजी राहुरी आणि बारामती या पोटनिवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे. तसेच य अगोदर 6 एप्रिल रोजी या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख होती. त्यानंतर 7 एप्रिलला अर्जाची छाननी झाली. तर 9 एप्रिल रोजी उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानंतर हा दोनही पोटनिवडणुका बिनविरोध होणार नसल्याचं स्पष्ट झालं होतं.

‘राजा शिवाजी’च्या ट्रेलरनंतर चित्रपटाविषयीची उत्सुकता शिगेला; दिग्गजांकडून कौतुकाची थाप

यावेळी राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत असून भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी सकाळीच आपल्या मतदानाचा हक्क बजावला असून आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर ही पोटनिवडणूक होत आहे.स्व.शिवाजीराव कर्डिले यांनी केलेले कामे आणि जनतेचा त्यांच्यावर असलेला विश्वास ज्या माध्यमातून आपल्याला जनता निवडून देईल असा विश्वास अक्षय कर्डिले यांनी मतदानानंतर व्यक्त केला आहे.

 

Exit mobile version