Akshay Kardile : राहुरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे अधिकृत उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचारार्थ पाथर्डी तालुक्यातील करंजी गावात आमदार मोनिका राजळे यांच्या उपस्थितीत भव्य प्रचार रॅली उत्साहात पार पडली. करंजी येथील उत्तरेश्वर मंदिरात नारळ नारळ वाढून रॅलीला सुरुवात या रॅलीत प्रियंका कर्डिले, अहिल्यानगर शहराच्या महापौर ज्योती गाडे यांच्यासह भाजप व महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
ज्या ताकदीने आणि प्रामाणिकपणे साहेबांनी काम केले, त्याच जोमाने अक्षय कर्डिले काम करतील
यावेळी बोलताना आमदार मोनिका राजळे (Monica Rajale) यांनी जोरदार शब्दांत मतदारांना साद घातली. त्या म्हणाल्या, दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी आपल्या गावांवर जिवापाड प्रेम केले. त्यांनी दिलेला विकासाचा वारसा अक्षय कर्डिले (Akshay Kardile) सक्षमपणे पुढे नेत आहेत. साहेब नसतानाही त्यांनी मतदारसंघासाठी मोठा निधी खेचून आणला आहे. त्या पुढे म्हणाल्या, शिवाजीराव कर्डिले (Shivajirao Kardile) यांचे प्रतिबिंब अक्षयदादांमध्ये स्पष्टपणे दिसते. ज्या ताकदीने आणि प्रामाणिकपणे साहेबांनी काम केले, त्याच जोमाने अक्षय कर्डिले काम करतील, याची मला खात्री आहे. यापुढेही गावांच्या विकासासाठी भरघोस निधी मिळवून देण्याची क्षमता अक्षयमध्ये आहे.
‘आशाताई’ -दि लास्ट एम्परर’ राज ठाकरे यांची भावूक पोस्ट
आमदार मोनिका राजळे मोठी बहीण म्हणून अक्षय कर्डिले यांच्या पाठीशी
मी एक मोठी बहीण म्हणून अक्षय कर्डिले यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. 23 तारखेला पाथर्डी तालुक्यातील प्रत्येक मतदाराने अक्षय कर्डिले यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार केला आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या भव्य रॅलीमुळे करंजी गावात भाजपच्या प्रचाराला मोठी ताकद मिळाली असून, अक्षय कर्डिले यांच्या विजयासाठी वातावरण तापल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
