Download App

फेक न्यूजला राज ठाकरे ही पडले बळी; देशातील आपत्कालीन सुविधांवर ठेवले बोट

  • Written By: Last Updated:

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray) देखील एका फेक न्यूजला बळी पडल्याचं समोर आलं आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी भारतातल्या आपत्कालीन सुविधेवर बोट ठेवत टीका केली होती. त्यानंतर जो व्हॉटस्अप व्हिडिओ पाहुन ठाकरेंनी बोट ठेवलंय तो व्हिडिओ जुना असल्याची माहिती समोर आलीय. त्यामुळे राज ठाकरेही फेक न्यूजला बळी पडू शकतात, हे सिद्ध झालंय. (Raj Thackeray is a victim of fake news; on emergency facilities in the country)

सामान्यांपासून मोठ – मोठे नेते फेक न्यूजला बळी पडतात. अशाच एका फेक बातमीला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे बळी पडलायचे दिसत आहे. मनसेच्या रस्ते साधन सुविधा विभागाच्या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरे यांनी साताऱ्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरेंनी परदेशातील आपत्कालीन सुविधांचे कौतुक केले. परंतु भारतातील आपत्काली सुविधांवर यावेळी राज ठाकरेंनी बोट ठेवले.

परदेशातील आपत्कालीन सेवेचं कौतुक करताना राज ठाकरे म्हणतात परदेशातल मैदानात पाऊस पडला तर ते सुकवण्यासाठी यंत्रणा होत्याचं ते सुकवण्यासाठी हेलिकॉप्टर आणलं आमच्याकडे अहमदाबादला एवढं बारीक गवत हेअर ड्रायने सुकवत होते अन् दुसऱ्या दिवशी सामना होणार असल्याचं सांगण्यात आलं असे म्हणत राज ठाकरेंनी देशातील आपत्कालीन सुविधांची खिल्ली उडवली.

लाठीचार्ज केलेले हे वारकरी हिंदू नाही का? रोहित पवारांचा सरकारला सवाल

भारतातील आपत्कालीन सुविधा बद्दल बोलताना राज ठाकरे यांनी चुकीचा संदर्भ सांगितला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टॅटियमवर 28 मी रोजी चेन्नई सुपरकिंग विरुद्ध गुजरात टायटन्सची IPL ची फायनल मॅच होती. परंतु पावसामुळे ही मॅच रद्द झाली. जाणीव ती मॅच दुसऱ्या दिवशी खेळवण्यात आली. दुसऱ्या दिवशी देखील पाऊस आल्याने मॅचचा खेळ झाला. त्यावेळी अहमदाबादच्या स्टॅटियम वरील सुविधांची सोशल मीडियावर खिल्ली उडवण्यात आली. अशातच काही युजरने मैदान सुखवण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर केला असे व्हिडिओ व्हायरल केले. याच व्हिडिओ चा संदर्भ देत राज ठाकरेंनी देशातील आपत्कालीन सुविधांवर बोट ठेवले. परंतु हा व्हिडिओ फेक आहे. यामुळे राज ठाकरे फेक बातमीला बळी पडल्याचे सिद्ध झाले आहे.

पण हेअर ड्रायने मैदान सुकवतानाच तो फोटो अहमदाबादच्या मैदानाचा नव्हता तर आसामच्या गुवाहाटीचा होता. 6 जाने 2020 रोजी गुवाहाटीच्या मैदानात भारत विरुद्ध श्रीलंकेचा टी20 सामना रंगणार होता. पावसाने हजेरी लावल्याने कर्मचाऱ्यांनी मैदान सुकवण्याचं काम हाती घेतलं पण जमीन अधिकच ओली झालेली होती. यावेळी कर्मचाऱ्यांनी हेअर ड्रायरही वापरलं होतं. पण परिणाम शून्य होतं अखेर मॅचही रद्द झाली होती.

Tags

follow us