राज्यात अवकाळी पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालंय. त्यामुळे अवकाळी पावसाची झळ ज्या शेतकऱ्यांना सोसावी लागत आहे. त्यांना लवकरात लवकर मदत मिळावी, अशी मागणी राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत मनसेचे आमदार राजू पाटील, बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, गजानन काळे हे नेते सह्याद्री अतिथीगृह येथे दाखल झाले आहेत. यापूर्वी देखील दोनदा राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली आहे.
राज्य सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; अजित पवारांचं राज्यपालांना पत्र
राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथी गृहावर भेट झाली. आगामी महापालिका निवडणुकांसाठी मनसे आणि शिंदे गट यांच्या युतीची चर्चा सुरू आहे. मात्र अद्याप दोन्ही पक्षाकडून युतीबाबत कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा युतीच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
आज राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. याचं कारण राज्यातील शेतकरी प्रश्नांवर राज ठाकरे काही मागण्या घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत काही नुकसानग्रस्त शेतकरी देखील असणार आहेत. मागच्या काही दिवसात राज्यात अनेक ठिकाणी गारपीटीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. पण या शेतकऱ्यांना कोणतीही नुकसान भरपाई मिळाली नाही.