Raj Thackeray : सौदीत भोंगे बंद होतात… मग भारतात मोदी का करत नाही?

मुंबई : आपल्याकडे काही लोकं सारखं हिंदुत्व-हिंदुत्व म्हणून बोलत यआहेत. मला त्यांनी एकदा हिंदुत्व समजून सांगावेच असे सांगत सौदी अरबमध्ये भोंगे बंद केले जात आहेत. मग भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी का बंद करत नाही, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा भोंगे विषय घेणार […]

Raj Thackeray Narendra Modi

Raj Thackeray Narendra Modi

मुंबई : आपल्याकडे काही लोकं सारखं हिंदुत्व-हिंदुत्व म्हणून बोलत यआहेत. मला त्यांनी एकदा हिंदुत्व समजून सांगावेच असे सांगत सौदी अरबमध्ये भोंगे बंद केले जात आहेत. मग भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी का बंद करत नाही, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा भोंगे विषय घेणार असल्याचे संकेतच दिले आहेत.

लोकमान्य सेवा संघ शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त मनसेचे राज ठाकरे यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्राची आजची परिस्थिती खूप गलिच्छ, घाण झाली आहे. हे राजकारण पाहिले तर मी या राजकारणात मिसफिट असल्याचे जाणवत आहेत.

Raj Thackeray तर महाराष्ट्राची अवस्था बिहार सारखी होण्याची भीती!

राज ठाकरे यांची गुढीपाडव्यानिमित्त शिवतीर्थावर जाहीर सभा होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी सौदी अरेबियात जर भोंगे बंद होत आहे. तर मग भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भोंगे बंद का करत नाही, असा थेट सवालच भाजपला विचारला आहे. त्यामुळे गुढीपाडव्याच्या सभेत शिवतीर्थावर राज ठाकरे हे पुन्हा एकदा भोंग्याचा विषय छेडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

उद्या माझी शिवतीर्थावर जाहीर सभा आहे. तिथे मी सविस्तर बोलेन असे सांगत उद्याच्या सभेत भोंग्यावरून राज ठाकरे हे आक्रमक भूमिका घेणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.

Exit mobile version