मुंबई : देशासह राज्यात गेल्या काही नेत्यांकडून अवमानजनक भाषा वापरली जातेयं, अशा नेत्यांवर प्रसारमाध्यमांनी बॅन टाकण्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ठणकावून सांगितलंय. गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांकडून अवमानजनक भाषा वापरण्यात आल्याचं समोर आलं होतं. त्यावर आता राज ठाकरेंनी आपलं मत मांडलंय.
राज ठाकरे पुढे बोलताना म्हणातात, विकासाचं व्हिजन कुठुन सुरु करायचं हेच कळत नाही. मागील दहा वर्षांपासून ज्या लोकांनी व्हिजन सांगितलं होतं त्या लोकांना माध्यमांनी विचारणा केली पाहिजे, की त्या व्हिजनचं काय झालं, याबाबत सत्ताधारी किंवा सत्तेतून उतार झालेल्यांना समोर आणून विचारणा केली पाहिजे, असं स्पष्ट मत ठाकरेंनी व्यक्त केलंय.
तसेच राज्यात निवडणुका आल्या नेत्यांकडून सारखं-सारखं त्याचं विषयावर बोललं जातं आणि मी जे बोलत होतो त्याचा काही लोकांनी अर्थ चुकीचा लावला. नवीन रस्ते उड्डाणपूल बांधले जात आहेत. शिक्षणाचेही तेच हाल, वैद्यकीयबाबतही तीच परिस्थिती आहे. पायाभूत सुविधा सोडून भलत्याचं गोष्टींकडे लक्ष देत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी सत्ताधाऱ्यांवर केला आहे.
त्याचप्रमाणे सरकारने आपल्या गरजा ओळखून खर्च केला पाहिजे, पायाभूत सुविधांकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे, आज रस्त्यावर वाहतूक कोंडी होते. त्याकंड सरकारचं लक्ष नाही. एकीकडं ऑटोमोबाईल इंडस्ट्री वाढतेयं पण गाड्या लावणार कुठे? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
दरम्यान, सुशोभिकरण म्हणून मुंबईतील लाईटच्या पोलवर दिवे लावले जात आहेत, संध्याकाळच्या वेळेला पाहिलं तर ही मुंबई आहे का डान्सबार हेच कळत नसल्याचं त्यांनी म्हंटलंय. मुंबईसारखीच पुण्याचीही अवस्था झालीय, पुणे शहर कुठुन कुठं वाढतं चाललंय हेच कळत नाही. कोणाच काय चाललंय, तर सरकारचं काय चाललंय काही कळत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.
दरम्यान, सर्वात आधी शहरात येणाऱ्या लोकांचे लोंढे थांबले पाहिजेत, आणि राज्यात रोजगार, वैद्यकीय, शैक्षणिक, पायाभूत सुविधांचे प्रश्न कसे सुटतील यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे माणसं बोलवा, आणि प्रश्नोत्तरे घ्या, अशी प्रमुख मागणीही त्यांनी यावेळी केलीय.