महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १७ वा वर्धापन दिन ९ मार्च रोजी साजरा करण्यात येणार आहे. त्याआधीच मनसेकडून “प्रतीक्षा ९ मार्च”ची या कॅप्शनखाली एक टीझर व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘प्रश्न जिथे जनतेचा, मार्ग तिथे मनसेचा’ हे गाणे या टीझरमध्ये वाजवण्यात येत आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटर अकौंट वरून हा व्हिडीओ शेअर केला आहे.
या टीझरमध्ये राज ठाकरे यांच्या जुन्या भाषणातील एक वाक्य टाकलं आहे. त्यात राज ठाकरे म्हणतात की ‘महाराष्ट्र हा लढवय्या महाराष्ट्र आहे. जे जे काही मिळवले ते लढून मिळवले आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला जाण्याचा प्रयत्न करु नका, हा तिसरा नेत्र जर या शिवरायाचा उघडला तर सर्व भस्मसात व्हाल’
प्रतीक्षा नऊ मार्चची pic.twitter.com/FDN5nSgtIm
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) March 1, 2023
हेही वाचा : Live Blog | Thackeray Vs Shinde : राज्यपालांची भूमिका योग्यच, शिंदे गटाचा युक्तिवाद
९ मार्चला मनसेचा वर्धापन दिन ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे साजरा होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरे हे देखील वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे ठाकरे यावेळी नेमके काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यात मागील काही दिवसापासून अनेक मोठया घडामोडी घडल्या आहेत. या घडामोडींबाबत काही दिवसापूर्वी एका मुलाखतीमध्ये मनसेप्रमुख राज ठाकरे यांना विचारले असता त्यांनी मोठं विधान केलं. महाराष्ट्रात सध्या हे जे काही चालू आहे त्यावर मी शिवतीर्थावर गुढीपाडव्यादिवशी सविस्तर बोलणार आहे. असं म्हटलं होत. त्यामुळे या मेळाव्यात राज ठाकरे नक्की काय बोलणार याची चर्चा रंगली आहेत.