शरद पवारांना धक्का! अहिल्यानगरमध्ये ऐन निवडणुकांच्या तोंडावर शिलेदाराचा राजीनामा

Rajendra Phalke राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असलेले राजेंद्र फाळके यांनी आपल्या पदाचा राजीनामा शशिकांत शिंदे यांच्याकडे दिला आहे.

Rajendra Phalke

Rajendra Phalke

Rajendra Phalke district president of the NCP Sharad Pawar party resignation : येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुका या पार पडणार आहेत. त्यानुषंगाने राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. मात्र हे सगळं सुरू असताना अहिल्यानगर जिल्ह्यातून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला धक्का देणारी एक बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असलेले राजेंद्र फाळके यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेले शशिकांत शिंदे यांच्याकडे दिला आहे. कौटुंबिक कारणास्तव आपण राजीनामा दिला असल्याचं फाळके यांनी म्हटले आहे. मात्र त्यांच्या राजीनाम्यामुळे जिल्ह्यात राजकीय तर्कवितर्क लावले जात आहे.

डोक्यात लोखंडी फावडे घालून सहकाऱ्याची हत्या; जवळच्या व्यक्तीनेच घात केल्याचा पोलिसांना संशय

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके हे पवारांचे विश्वासू शिलेदार समजले जात असत. गेली अनेक वर्षे त्यांनी राष्ट्रवादीमध्ये आपल्या जबाबदाऱ्या व्यवस्थित सांभाळल्या. तसेच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये निलेश लंके यांना विजय मिळवून देण्यामध्ये देखील फाळके तात्या यांची महत्त्वाची भूमिका होती.

वाढदिवसापासून The RajaSaab च्या इंट्रो गाण्याच्या रिलीजपर्यंत, प्रभाससाठी ऑक्टोबर महिना होणार खास

मात्र विधानसभा निवडणुकीनंतर राज्यामध्ये महाविकास आघाडीला मोठा फटका बसला. त्यानंतर अनेकांनी आपली राजकीय भवितव्य पाहता सत्ताधारी पक्षाकडे वाटचाल केली. दरम्यान येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पार पडणार आहे . मात्र त्यापूर्वीच राष्ट्रवफीला मोठा धक्का बसला आहे. राजेंद्र फाळके यांनी आज (ता. १५) पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे दिला आहे. कौटुंबिक कारणास्तव पद सोडण्याचे त्यांनी म्हटले आहे. 2018 पासून ते जिल्हाध्यक्ष होते. त्यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Exit mobile version