Raju Shetti : स्वाभिमानी संघटनेचे नेते आणि माजी खासदार यांनी रासायनिक खतांच्या किंमती, साखरेचे भाव, एफआरपी आणि विमा कंपन्यांच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली. यावेळी त्यांनी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना देखील फैलावर घेतल्याचं पाहायला मिळालं. यावेळी त्यांनी दुष्काळ जाहीर करण्याची मागणी देखील सरकारकडे केली.
मुंडे हे बीडचे कृषीमंत्री नाहीत…
मुख्यमंत्र्यांनी दही हांडी आणि गणेश मंडळांना भेट दिली म्हणजे ते काम करतात असं नाही. तसेच सध्या राज्यात पीकांची अवस्था वाईट आहे. ऐन फुल येण्याच्या काळात ही पीक सुकून गेले आहेत. विमा कंपन्या मात्र नियम पुढे करुन विमा द्यायला तयार नाहीत. ब्रिटिशकालीन निकष बदलायला हवेत. बाबा आदमच्या काळातले निकष लावून शेतकऱ्यांना विमा द्यायला लागलो तर विमा कंपन्यांची चंगळ होईल. असं राजू शेट्टी म्हणाले.
Shah Rukh Khan: हॉलिवूडमध्ये काम करण्याच्या सवालावर किंग खानने केला खुलासा; म्हणाला…
त्याचबरोबर त्यांनी यावेळी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना देखील फैलावर घेतल्याचं पाहायला मिळालं. ते म्हणाले, राज्याचे नवे कृषीमंत्री धनंजय मुंडे सध्या उत्साहात आहेत पण त्यांनी हे विसरू नये की, ते बीडचे कृषीमंत्री नाहीत. संपूर्ण राज्याचे कृषीमंत्री आहेत. कारण त्यांनी पीक विमा कंपन्यांना शेतकऱ्यांना अग्रिम रक्कम द्या असा आदेश देताना त्यांनी बीडमधील सगळे सर्कल निवडले त्यांनी शेजारच्या जिल्ह्यात त्यांनी लक्ष दिले नाही.
J&K Anantnag Encounter: अनंतनागमध्ये ४८ तासांपासून चकमक सुरू, आणखी एक जवान शहीद
त्याचबरोबर यावेळी शेट्टी एफआरपी, रासायनिक खतांच्या किंमती आणि साखरेच्या भावावर देखील बोलले ते म्हणाले, रासायनिक खतांच्या किंमती वाढल्या आहेत आणि या आठवड्यात आणखी वाढणार आहेत असा अंदाज आहे. जागितक बाजरपेठेत रासायनिक खतांचा भाव वाढल्याचं सांगत जर खतांचे भाव वाढवले जात असतील तर साखरेचे भावही जागतिक बाजारपेठेत वाढत आहेत. मग साखरेचे भाव का? वाढवले जात नाहीराज्यातील जवळपास सर्वच साखर कारखान्यांकडे साखरेची विक्री करुन जास्त पैसे शिल्लक आहेत.
Jalgaon Crime : बापाच्या नात्याला काळीमा; तिसरी मुलगी झाल्याने आठ दिवसांच्या लेकीच्या तोंडात…
अस असताना तीन तीन वर्षे साखर आयुक्तालय करखान्यांचे ऑडिट करत नाहीत. याचा अर्थ साखर आयुक्तांचा कारखान्यांना पाठींबा आहे का? साखरेचे अतिरिक्त पैसे कारखान्यांना मिळालेत त्याचा हिशोब द्यायला हवा. एफआरपीपेक्षा चारशे रुपये जास्त दिले तरच यावर्षी कारखान्यांना ऊस देणार, अन्यथा कारखान्याला ऊस देणार नाही. टनाला एफआरपी पेक्षा चारशे रुपये दिले नाहीत तर महाराष्ट्रातला एकही कारखाना चालू देणार नाही. असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.
मराठवाड्याला मिळणार 40 हजार कोटींचे पॅकेज? अमृत महोत्सवानिमित्त शिंदे सरकार देणार मोठे गिफ्ट
त्याचबरोबर ते असं देखील म्हणाले की, आमचा सरकारच्या व्यवस्थेवरचा विश्वास उडत चालला आहे. प्रश्न मांडण माझं काम आहे. प्रश्न मांडल्यावरही सरकार मला गांभीर्याने घेत नाही हे मला माहिती आहे याला दुसरा पर्याय माझ्याकडे आहे. आंदोलन. मग नाक दाबलं की तोंड उघडत. त्यासाठी 2 ऑक्टोबरपर्यंतचा सरकारला अल्टीमेट देत आहे. दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करतोय
तर गोकुळच्या सर्वसाधारण सभेवर बोलचताना शेट्टी म्हणाले, ज्या शिखर संस्था आहेत गोकूळ किंवा कुठल्याही. त्यातील जे लाभधारक आहेत त्यांना जेव्हा मतदानाचा अधिकार मिळेल तेव्हा सर्व निट चालेल. तसेच इंडियाच्या बैठकीचं मला निमंत्रण होत. पण त्यात महाविकास आघाडीतलेच पक्ष आहेत. महाविकास आघाडीच्या काळात शेतकरी विरोधी निर्णय घेतले गेले, त्या मुद्दयावर चर्चाच झाली नाही, म्हणून महाविकास आघाडीतुन बाहेर पडलो होतो. मग परत त्याच लोकांच्या सोबत का जायचं?