पुण्यातील ‘जैन बोर्डिंग हाऊस’च्या जमीन विक्रीवरुन राजकारण तापलं; रोहित पवार अन् राजू शेट्टींकडून थेट आरोप

जैन बोर्डिंग हॉस्टेल विक्रीच्या मुद्द्यावरुन शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी काही गंभीर आरोप केले आहेत.

Punee

Punee

पुण्यात सध्या राजकीय वातावरण प्रचंड तापलं आहे. शहरातील मॉडेल कॉलनीच्या परिसरातील ‘जैन बोर्डिंग हॉस्टेल’ची जागा बेकायदेशीरपणे विकल्याच्या मुद्द्यावरुन हे सगळं वातावरण ढवळून निघालं आहे. (Pune) या प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांवर विरोधकांनी थेट आरोप केले आहेत. दरम्यान, आज पुण्यात जैन समाजाकडून आंदोलन करण्यात आलं. जैन बोर्डिंग कृती समितीच्यावतीने या आंदोलनाची हाक देण्यात आली होती. जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला होता.

जैन बोर्डिंग हॉस्टेल विक्रीच्या मुद्द्यावरुन शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी काही गंभीर आरोप केले आहेत. पुण्यातील जैन धर्मियांची मोक्याची तब्बल साडेतीन एकर जागा अनेक कटकारस्थाने करून हडपली गेली असून यामध्ये आर्थिक लाभासाठी सरकारमधील काही नेत्याचाच हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात असून काही नेत्यांचे नातलगही यामध्ये पार्टनर असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे. इतर वेळेस स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या या लोकांनी धंदा आणि पैशांसाठी जैन मंदिरही गिळंकृत केलं. सत्तेचा वरदहस्त असेल तर फाईली किती वेगाने पळतात हे नवी मुंबईत सिडको प्रकरणात दिसलंच तसं या प्रकरणातही दिसून येत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

शिक्षण क्षेत्रात देश घडविण्याची ताकद : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू करमाळकर यांचे मत

या प्रकरणावर रोहित पवार यांनी ट्वीट केलं आहे. त्यामध्ये ते पुढं म्हणतात, या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन जैन बांधवांना न्याय मिळाला पाहिजे. त्यासाठी जैन मंदिराची जमीन हडपणाऱ्यांविरोधात आम्ही जैन बांधवांच्या लढ्यात सोबत आहोत. सरकारनेही यात हस्तक्षेप करुन त्यांना त्यांना न्याय मिळवून द्यावा, अन्यथा या प्रकरणाचे सर्व पुरावे आमच्याकडं असल्याने आम्ही या पुराव्यांसह रस्त्यावर उतरु, असा इशाराच त्यांनी दिला आहे. पुण्यातील जैन धर्मियांची मोक्याची तब्बल साडेतीन एकर जागा अनेक कटकारस्थाने करून हडपली गेली असून यामध्ये आर्थिक लाभासाठी सरकारमधील काही नेत्याचाच हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात असल्याचं ते म्हणाले.

पुण्यातील जैन बोर्डिंग हॉस्टेलची जागा शिवाजी नगर येथे आहे. जिथे दिगंबर जैन बोर्डिंग आणि शेतंबर जैन बोर्डिंग आहे. 1958 साली हिराचंद नेमचंद दोषी यांनी या वसतीगृहाची उभारणी केली होती. ही जागा काही महिन्यांपूर्वी चर्चेत आली होती. कारण विश्वस्त या जागेवर नियंत्रण ठेवून नवीन विकास करण्यास इच्छूक होते. तर, समाजातील काही लोकांनी याला विरोध केला होता. मात्र, काही दिवसांपूर्वीच ही जागा परस्पर हडप करुन तिची विक्री करण्यात आल्याचा आरोप जैन समाजाकडून केला जात आहे. पुण्याच्या धर्मादाय आयुक्तांनी या जागा विक्रीला मंजुरी देताना सर्व नियम, कायद्यांची पायमल्ली केली. या जमीनविक्रीच्या व्यवहाराशी संबंध असलेल्या गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीचा इथल्या नेत्यांशी लागेबांधे असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.

या प्रकरणात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी जोरदार प्रहार केला आहे. पुण्यातील मोक्याच्या जैन बोर्डिंगच्या जागेच्या विक्रीवरून वादाच्या केंद्रस्थानी काही नेते असल्याचं उल्लेख त्यांनी केला आहे. बिल्डर आणि काही नेत्यांनी मिळून जागा विकल्याचा आरोप शेट्टी यांनी केला. त्याचबरोबर राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांच्या लक्ष घालू भूमिकेवरून चांगलाचा समाचार घेतलाय. आम्हाला आश्वासनाची गरज नाही. हा व्यवहार रद्द झाल्याची ऑर्डर आल्यानंतर विश्वास ठेवू, फडणवीसांनी सकारात्मक पाऊल टाकलं यासाठी आभार.दिवाळीनंतर स्थगिती आदेश घेऊन मुख्यमंत्र्यांनी पुण्याला यावं, आम्ही त्यांचा सत्कार करू . अन्यथा आमचा लढा सुरुच राहील असंही ते म्हणाले.

Exit mobile version