Jyoti Waghmare : शिंदेंच्या फायर ब्रँड नेत्या ज्योती वाघमारेंची संपत्ती किती?

Jyoti Waghmare : नुकतंच राज्यातील 7 राज्यसभेच्या जागांसाठी निवडणूक बिनविरोध पार पडलीय. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकथान शिंदे यांनी

Jyoti Waghmare

Jyoti Waghmare

Jyoti Waghmare : नुकतंच राज्यातील 7 राज्यसभेच्या जागांसाठी निवडणूक बिनविरोध पार पडलीय. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकथान शिंदे यांनी पक्षातील फायरब्रॅन्ड नेत्या ज्योती वाघमारे यांनी संधी दिलीय. अर्ज दाखल करण्याच्या काही तासांपूर्वी त्यांच्या नावाची घोषणा पक्षाकडून करण्यात आल्यानंतर ज्योती वाघमारे कोण आहे? त्यांची संपत्ती किती? असे अनेक प्रश्न विचारण्यात येताय. जाणून घ्या ज्योती वाघमारे यांची एकूण संपत्ती किती आहे?

राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करताना ज्योती वाघमारे प्रतिज्ञापत्र सादर केलाय. या प्रतिज्ञापत्रानुसार ज्योती वाघमारे यांची एकूण जंगम मालमत्ता 5,78,088 (पाच लाख अठ्ठ्याहत्तर हजार अठ्ठ्याऐंशी रुपये) इतकी असून स्थावर मालमत्ता 32,74,000 (बत्तीस लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये) इतकी आहे.

कोण आहे ज्योती वाघमारे?

सोलापुरातल्या आंबेडकरी चळवळीत सक्रिय काम करणारा चेहरा म्हणून महाराष्ट्रात त्यांची ओळख असून त्यांचं मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलगू आणि कन्नड या पाच भाषांवर प्रभुत्व आहे. त्यांनी इंग्रजी साहित्यात पीएचडी केली आहेय. 2023 मध्ये त्यांनी शिवसेना (Shivsena) शिंदे गटात प्रवेश केला असून या पूर्वी त्यांनी सोलापूर शहर काँग्रेस अध्यक्ष म्हणून काम पाहिलं.

प्रतिज्ञापत्रानुसार ज्योती वाघमारे यांच्याकडे 63 हजार रुपये रोख रक्कम असून पती धनंजय मोरे यांच्याकडे 9 हजार रोख रक्कम आहेय. तर 1,45,744 (एक लाख पंचेचाळीस हजार सातशे चव्वेचाळीस रुपये) वेगवेगळ्या बँकेत ठेवी म्हणून ठेवल्या आहेत. याचबरोबर त्यांनी मनोरमा बँकेच्या शेअर्समध्ये 5 हजारांची गुंतवणूक देखील केलीय. तर 95 हजार रुपयांची त्यांच्या नावावर एक दुचाकी आहेय. तसेच 2,52,100 रुपये सध्याच्या बाजार भावानुसार 17 ग्रॅम सोने आणि 17,244 रुपये सध्याच्या बाजार भावानुसार 41 ग्रॅम चांदी आहेय. तर त्यांच्यावरती 27,40,564 रुपयांचे कर्ज असून सोलापूर जिल्ह्यात  33,60,000 बाजारभाव असणारी जमीन देखील त्यांच्या नावावर असल्याची माहिती त्यांनी प्रतिज्ञापत्रात दिलीय.

थोडक्यात प्रतिज्ञापत्र माहिती

रोख रक्कम :  63 हजार रुपये

मुदत ठेवी : 1,45,744  रुपये

शेअर्स :   मनोरमा बँक (5000 रुपये)

वाहन :  सुझुकी बर्गमन (95000 रुपये)

17 ग्रॅम सोने : 2,52,100 रुपये

41 ग्रॅम चांदी : 17,244 रुपये

सोलापूर जिल्ह्यात जमीन ( 33,60,000 बाजार भाव)

कर्ज : 27,40,564

इराण आणि इस्रायलमधील युद्ध 12 मार्च रोजी संपणार ? ; डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत-

ज्योती वाघमारे यांचे प्रतिज्ञापत्र वाचवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-

Dr. Jyoti Waghmare Compressed

Exit mobile version