Maya Ivnate : नागपूरच्या माजी महापौर ते राज्यसभेच्या खासदार ‘मायाताईं’ ची संपत्ती किती?

Maya Ivnate : राज्यसभेसाठी भाजपकडून महाराष्ट्रातून 4 जणांना संधी देण्यात आलीय.  भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे,  केंद्रीय मंत्री रामदास

Maya Ivnate

Maya Ivnate

Maya Ivnate : राज्यसभेसाठी भाजपकडून महाराष्ट्रातून 4 जणांना संधी देण्यात आलीय.  भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे,  केंद्रीय मंत्री रामदास आठवले,  रामराव वडकुते आणि माया इवनाते (Maya Ivnate) राज्यसभेवर जाणार आहेत. माया इवनाते नागपूरच्या माजी महापौर असून त्या आता राज्यसभेवर जाणार आहेत. स्थानिक पातळीवर ‘मायाताई‘ ओळखल्या जाणाऱ्या इवनाते यांची एकूण संपत्ती किती हे जाणून घ्या.

राज्यसभेसाठी (Rajya Sabha Election) उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांची जंगम मालमत्ता 75,25,320  (पंच्याहत्तर लाख पंचवीस हजार तीनशे वीस रुपये) असून स्थावर मालमत्ता 25,00,000 (पंचवीस लाख रुपये) इतकी आहेय.

प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याविरोधात कोणताही फौजदारी गुन्हा दाखल नाहीय. त्यांच्याकडे 35000 रुपये रोख आहेत. तर 2,75,320 (दोन लाख पंच्याहत्तर हजार तीनशे वीस रुपये) वेगवेगळ्या बँकेत ठेवी म्हणून ठेवल्या आहेत.  याचबरोबर त्यांनी बँक आणि पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये 9,65,000 (नऊ लाख पासष्ट हजार रुपये) त्यांनी गुंतवणूक केलीय.

तर 28,00,000 (अठ्ठावीस लाखांची) त्यांच्या नावावर एक चारचाकी वाहन आहेय.  तसेच 34,50,000 रुपये (चौतीस लाख पन्नास हजार रुपये) सध्याच्या बाजार भावानुसार 291 ग्रॅम सोने आहेय. तसेच 3,30,00,000 (तीन कोटी तीस लाख रुपये) जमीन त्यांच्या नावावर असून त्यांच्यावर 16,27,000 रुपयांचा (सोळा लाख सत्तावीस हजार) कर्ज असल्याची माहिती त्यांनी प्रतिज्ञापत्रात दिलीय.

थोडक्यात प्रतिज्ञापत्र माहिती

जंगम मालमत्ता : 75,25,320

स्थावर मालमत्ता : 25,00,000

रोख : 35000 रुपये

ठेव :  2,75,320  रुपये

गुंतवणूक :  9,65,000 रुपये

चारचाकी वाहन : 28,00,000 रुपये, Toyota Innova Crysta कार

सोने ( 291 ग्रॅम) : 34,50,000 रुपये

जमीन :  3,30,00,000

कर्ज : 16,27,000 रुपये

शिंदेंच्या फायर ब्रँड नेत्या ज्योती वाघमारेंची संपत्ती किती?-

माया इवनाते यांचे प्रतिज्ञापत्र वाचवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-

Smt. Maya Ivnate Compressed

Exit mobile version