Sharad Pawar’s assets are Rs 60.71 crore : ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सक्रिय राजकीय कारकीर्द आता सहा दशकांहून अधिक काळाची झाली आहे. 1956 साली गोव्याच्या स्वातंत्र्य आंदोलनात सहभाग घेत त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरूवात केली. त्यानंतर 1967 मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेत आमदार म्हणून निवडून आले आणि तेव्हापासून आजपर्यंत ते सक्रिय राजकारणात कार्यरत आहेत. 2026 हे वर्ष त्यांच्या संसदीय कारकिर्दीतील 60 वे वर्ष ठरत आहे. दरम्यान, नुकताच त्यांनो राज्यसभेसाठी अर्ज दाखल केला असून या अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून त्यांच्या मालमत्तेची माहिती समोर आली आहे.
सादर केलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांची एकूण जंगम मालमत्ता सुमारे 44 कोटी 72 लाख रुपये इतकी आहे. यामध्ये त्यांच्या जवळील रोख रक्कम 1 लाख 25 हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच विविध बँका आणि वित्तसंस्थांमध्ये त्यांच्या नावावर 11 कोटी 66 लाख रुपयांच्या मुदत ठेवी असल्याची माहिती अर्जात नमूद करण्यात आली आहे.
Iran Israel War : इराण आणि इस्रायलमधील युद्ध 12 मार्च रोजी संपणार?; डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
याशिवाय समभाग, म्युच्युअल फंड आणि इतर गुंतवणुकींमध्ये त्यांनी सुमारे 27 कोटी रुपयांची गुंतवणूक देखील प्रतिज्ञापत्रात नमूद आहे. सोने व चांदीचे दागिने आणि मौल्यवान वस्तूंची किंमत सुमारे 3 कोटी 85 लाख रुपये इतकी असल्याचेही त्यात नमूद करण्यात आले आहे. स्थावर मालमत्तेबाबत बोलायचे झाल्यास, बारामती परिसरातील शेती, घर आणि सदनिका अशा मालमत्तेचे सध्याचे अंदाजे मूल्य सुमारे 15 कोटी 99 लाख रुपये असल्याची नोंद करण्यात आली आहे.
दायित्वांच्या बाबतीत, ‘सुप्रिया एंटरप्रायजेस’ या संस्थेकडे सुमारे 49 लाख 84 हजार रुपयांचे दायित्व असल्याचेही या अर्जातून स्पष्ट झाले आहे. या सर्व मालमत्ता आणि दायित्वांचा विचार करता, शरद पवार यांची एकूण मालमत्ता सुमारे 60 कोटी 71 लाख रुपये इतकी असल्याची माहिती राज्यसभेसाठी सादर केलेल्या अर्जातून समोर आली आहे.
शरद पवार यांचे प्रतिज्ञापत्र वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…
