Download App

Ramdas Athawale : 40 जण नाहीत चोर, संजय राऊतांनी करु नये शोर

  • Written By: Last Updated:

कोण चोर आहे? कोण जेल मध्ये जाऊन आलेय हे सगळयांनी पाहिजे आहे. त्यामुळे विधिमंडळाला असं म्हणणे बरोबर नाही. असं मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विधीमंडळाला चोरमंडळ म्हटल्याने प्रचंड गदारोळ सुरू आहे. या मुद्द्यावर विधीमंडळात (Maharashtra Budget) सत्ताधाऱ्यांनी प्रचंड गदारोळ घातला.

हेही वाचा : Sanjay Raut : तुरुंगात गेलो, यांना काय घाबरायचं ?; हक्कभंगाच्या गदारोळावर राऊतांनी सुनावले

राऊतांवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर विधीमंडळाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. या सगळ्या प्रकारावर सत्ताधारी पक्षातील नेते राऊत यांच्यावर तुटून पडले आहेत. या सगळ्या गदारोळावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “ते चाळीस जण नाहीत चोर, संजय राऊत यांनी करून जास्तीचा शोर”अशी आठवले स्टाईल कविता म्हणत त्यांनी राऊत यांना टोला लगावला आहे.

एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून बाहेर पडलेले नाहीत, त्याउलट त्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना शिवसेनेतून बाहेर काढले आहे. निवडणूक आयोगाने तसा निकाल दिला आहे. सुप्रीम कोर्टात देखील तोच निकाल येईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. जर उद्धव ठाकरे यांनी २०१४ मध्ये भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला नसता तर हि वेळ आली नसती असा टोलाही यांनी ठाकरे गटाला लगावला आहे.

Tags

follow us