Download App

उद्धव ठाकरे भिकेचा कटोरा घेऊन भाजप अन् राज ठाकरेंकडे… रामदास कदमांचा मोठा गौप्यस्फोट

Ramdas Kadam यांनी उद्धव ठाकरे भिकेचा कटोरा घेऊन भाजप अन् राज ठाकरेंकडे अस म्हणत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

Ramdas Kadam on Udhhav Thackeray for allince with BJP and Raj Thackeray : महाराष्ट्र विधिमंडाळाचं पावसाळी अधिवेशन सुरु होतं. त्यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आई ज्योती रामदास कदम यांच्या नावावर मुंबईतील कांदिवली परिसरातील सावली डान्सबार असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या दरम्यान आता रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले रामदास कदम?

उद्धव ठाकरे हे एका पक्षाचे नेते आहेत. शिवसेना प्रमुखांचा मुलगा आहेत. पण ते निवडणूक आयोगाला धोंडा म्हणत आहेत. हे काय बिहार आहे का? तसेच मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पंतप्रधानांवरही वाटेल ते बोलायचं. एकनाथ शिंदेंना नको नको ते शब्द वापरायचे आणि पुन्हा पंतप्रधानांच्या पायावर डोक ठेवून मला आणि माझ्या मुलाला दिशा सालियान प्रकरणामधून वाचवा असं साकडं घालायचं. पण उद्धवजी तुम्हाला वाटतं मांजर डोळे झाकून दूध पितं पण तसं नाही आहे.

अमेरिका-चीनला शह देण्याची तयारी, PM मोदींचा ब्रिटन अन् मालदीव 4 दिवसांचा दौरा ठरला

मला सगळं माहिती आहे. त्यांनी कशाप्रकारे दिशा सालियान प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंना क्लिन चिट मिळवण्याचे प्रयत्न केले गेले. मला न्यायालयावर काहीही बोलायचं नाही. उद्धव ठाकरेंचं सगळं राजकारण संपलेलं आहे. आता आम्हाला भाजपसोबत घ्या. आमची तयारी आहे. एकनाथ शिंदेंना संपवा म्हणजे आम्ही भाजपमध्ये यायाला रिकामे. तसेच आमच्या कुटुंबाचे डान्स बार असल्याच्या बातम्या चालवल्या जात आहेत. पण आम्ही कधीही लोकांची कुटुंब उद्ध्वस्त केलेली नाही. पण ठाकरेंचा खोटा वकील आमची बदनामी करत आहे.

Eng vs Ind 4th Test : चौथ्या कसोटीपूर्वी टीम इंडियामध्ये मोठा बदल, ‘हा’ भारतीय खेळाडू बाहेर

तसेच उद्धव ठाकरे जरी राज ठाकरेंसोबतच्या युतीवर बोलत असले तरी देखील राज ठाकरे मात्र यावर अजूनही बोललेले नाही. उद्धव ठाकरेंच त्यांच्या भिकेचा कटोरा घेऊन मला भिक दे माझ्यासोबत ये असं म्हणत आहेत. ते एकत्र आले तर आनंद आहे. पण मुंबईमध्ये मराठी माणसं शिल्लकच राहिली नाहीत. त्यांना उद्धव ठाकरेंनीच मुंबईच्या बाहेर घालवलं आहे. आता काशाला मराठीचं नाव घेत आहेत. पंतप्रधानांनी मराठीला आभिजात भाषेचा दर्जा दिला त्याबद्दल एक शब्द तरी बोला.

follow us