Download App

समान नागरी कायद्याबाबत रावसाहेब दानवेंच मोठं वक्तव्य, म्हणाले…

  • Written By: Last Updated:

सध्या देशभरात समान नागरी कायद्यावरून राजकारण चांगलेच तापलेले आहे. देशातील उत्तरेकडील काही राज्यामध्ये समान नागरी कायदा लागू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकी पूर्वी देशात समान नागरी कायदा करण्याबाबत केंद्र सरकारकडून तयारी केली जात आहे. समान नागरी कायद्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी सकारात्मक असल्याचे दिसत आहे.

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना जेव्हा देशात समान नागरी कायदा लागू करण्याच्या हालचाली सुरू आहेत असे पत्रकारांनी विचारले असता. त्यावर दानवे म्हणाले हे बरोबर आहे की देशभरात समान नागरी कायदा लागू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. परंतु -ज्यावेळी या कायद्याचा मसुदा तयार होऊन जनतेसमोर ठेवला जाईल त्यावेळी यावर भाष्य करणे योग्य ठरेल.

तसेच समान नागरी कायद्याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्रकारांनी विचारले असता तेव्हा ते म्हणाले समान नागरी कायद्याच्या बातम्या खोट्या आहेत. असे काहीही सध्या देशात सुरु नाही. आणि ते करणे शक्य देखील नाही. माझी त्या राज्यातील आमच्या सहकार्यांशी चर्चा झाली. परंतु असे काहीही त्या राज्यात सुरु नाही. फक्त चर्चा आहे. राजकारणात चर्चात होतंच असतात असे यावेळी पवार म्हणाले.

तसेच रावसाहेब दानवे यांना संसदेच्या नवीन इमारतीच्याबाबतीत विचारले असता दानवे म्हणाले…उद्या नवीन संसदेचे उद्घाटन आहे. कुठल्या तरी मुद्द्यावर वाद तयार करून चर्चा घडवून आणणे बरोबर नाही. हे देशाचे सर्वोच्चसभागृह आहे. या सभागृहाचा मान, शान राखला पाहिजे. उगीचचं अशा या चांगल्या कार्यक्रमाला वाईट बोलणं किंवा विरोध करणे विरोधी पक्षाला शोभत नाही.

यावर उत्तर देताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले नवी इमारत बांधणे हे आम्ही वर्तमान पत्रात वाचले. नंतर भूमिपूजन झालं तेव्हाही आमंत्रण नाही. विरोधकांना विश्वासात घ्यायला हवे होते. म्हणून बहिष्कार घालण्याचा निर्णय काहींनी घेतला तो आम्हाला मान्य आहे.

Tags

follow us