Download App

’50 खोके’चे रॅप सॉंग करणारा राज मुंगासेला अटक ; आव्हाड भडकले

मुंबई : चोर आले… चोर आले… एकदम ओके होऊन, पन्नास खोके घेऊन किती चोर आले, हे रॅप सॉंगनं (Rap song)सोशल मीडियावर (Social media) काही दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे. या मराठमोळ्या रॅपरनं आपल्या गाण्यातून राज्यातील भाजप,(BJP) शिवसेना शिंदे गटावर (Shivsena Shinde Group) जोरदार टीका केली आहे. या रॅपचा व्हिडीओ (Viral Video)विरोधकांनी मोठ्या प्रमाणात शेअर केला आहे. आणि पाहता-पाहता एका आठवड्यात या रॅप सॉंगनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळतंय. त्यानंतर मंगळवारी ठाणे (Thane)जिल्ह्यातील पोलिसांनी मंगळवारी छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar)मधील रॅपर राज मुंगासेवर भाजप-एकनाथ शिंदे सेना (BJP-Eknath Shinde Sena)सरकारच्या विरोधात बदनामीकारक रॅप सॉंग गायल्याबद्दल गुन्हा दाखल केला. आता या मराठमोळ्या रॅपरला पोलिसांनी त्याच्या घरातून अटक केली आहे. या मराठमोळ्या रॅपरच्या अटकेवरुन राष्ट्रवादीचे (NCP)आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad)यांनी पोलीस प्रशासनावर आणि शिंदे फडणवीस सरकारवर ट्वीटद्वारे निशाणा साधला आहे.

बॉलिवूडमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी! राजश्री प्रोडक्शनची सिनेसृष्टीतील प्रसिद्ध निर्मात्यांसह हातमिळवणी

जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, राज मुंगासे या नवोदित कलाकाराने एक गाणं म्हटलं म्हणून त्याच्या घरातून संभाजीनगर पोलीसांनी त्याला अटक केली व ते त्याला अंबरनाथ पोलिसांच्या हाती देतील. पण, त्याचा गुन्हा काय? त्याने तर कोणाचे नाव देखील घेतले नव्हते. 50 खोके हे कोणाचे नाव आहे का? हे आधी पोलिसांनी स्पष्ट करावं.

50 खोके या वक्तव्याने जातीय तणाव किंवा धार्मिक तणाव निर्माण होतो कसा? हे पोलिसांनी सिद्ध करावं. म्हणजे संविधान पायदळी तुडवण्याचाच निर्णय झाला आहे, असे दिसतं. आम्ही सगळे राज मुंगासे याच्या पाठिशी आहोत. संपूर्ण महाराष्ट्र त्याच्या पाठिशी उभा राहील. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोठू शकत नाही. हे पोलिसी राज नाही, अशी परखड टीका राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

शिवसेना शिंदे गटाच्या युवासेना कोअर कमिटी सदस्य स्नेहल कांबळे यांनी रॅपर राज मुंगासेविरोधात अंबरनाथ पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी मराठमोळ्या रॅपर मुंगासेविरोधात बदनामीचा गुन्हा दाखल केला. रॅपरनं राज्य सरकारविरोधात बदनामीकारक रॅप केले असल्याचा आरोप स्नेहल कांबळे यांनी केला आहे. त्यानंतर आता पोलिसांनी आपला तपास सुरु करुन रॅपर राज मुंगासेला अटक केली आहे.

Tags

follow us