बँकेसोबतच ‘या’ ठिकाणीही जमा होतेय दोन हजारांची नोट

RBI Has Withdrawn Rs 2000 Notes : आरबीआयने दोन हजाराची नोट ही चलनातून हटवली आहे. आरबीआयच्या निर्णयानंतर नागरिक आपल्याजवळ असलेल्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकांकडे धाव घेत आहे, मात्र बँकांमध्ये या नोटा 23 मे पासून स्वीकारण्यात येणार असून यासाठी नागरिकांना बँकेत जाऊन या नोटा जमा कराव्या लागणार आहेत. असे असले तरी एक दिलासादायकबाब म्हणजे काही एटीएममध्ये […]

Untitled Design   2023 05 22T200343.967

Untitled Design 2023 05 22T200343.967

RBI Has Withdrawn Rs 2000 Notes : आरबीआयने दोन हजाराची नोट ही चलनातून हटवली आहे. आरबीआयच्या निर्णयानंतर नागरिक आपल्याजवळ असलेल्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकांकडे धाव घेत आहे, मात्र बँकांमध्ये या नोटा 23 मे पासून स्वीकारण्यात येणार असून यासाठी नागरिकांना बँकेत जाऊन या नोटा जमा कराव्या लागणार आहेत. असे असले तरी एक दिलासादायकबाब म्हणजे काही एटीएममध्ये असलेल्या सीडीएममशीन मध्ये म्हणजेच कॅश डिपॉझिट मशीनमध्ये दोन हजारांच्या नोटा या स्वीकारल्या जात आहे.

आरबीआयने यापूर्वी 500 व 1000 रुपयांच्या नोटा या चलनातून बंद केल्या होत्या. त्यावेळी या नोटा बँकेत जमा करण्यासाठी नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. अक्षरशः अनेकांचा कडाक्याच्या उन्हात बँकेच्या बाहेर रांगेत उभा राहून मृत्यू देखील झाल्याची घटना घडल्या. यानिर्णयामुळे नागरिकांमधून मोठा संताप देखील व्यक्त करण्यात आला होता.

दरम्यान आता पुन्हा एकदा भारतीय रिझर्व्ह बँकेने चलनातून दोन हजाराची नोट ही बाद केली आहे. येत्या सप्टेंबरनंतर ही नोट चलनात दिसणार नाही आहे. दरम्यान दोन हजारांची नोट बदलून घेण्यासाठी आरबीआयने नागरिकांना चार महिन्याचा म्हणजे 30 सप्टेंबरपर्यंतचा वेळ दिला आहे. त्यामुळे देशातील सर्वोच्च किंमतीची नोट पूर्णपणे बंद होणार आहे.

ज्यांच्याकडे दोन हजारांच्या नोटा आहेत त्यांना त्या नोटा 30 सप्टेंबर पूर्वी बँकेत जमा कराव्या लागणार आहे. यासाठी आता नागरिकांकडून बँकेत गर्दी केली जाण्याची शक्यता देखील निर्माण होत आहे. मात्र काळजी करण्याची गरज नाही कारण दोन हजारांच्या नोटा या बँकेसोबतच सीडीएममशीन (कॅश डिपॉझिट मशीन) मध्ये देखील जमा करता येत आहे. काही ठिकाणी सीडीएममशीन मध्ये दोन हजारांच्या नोटा या डिपॉझिट केल्या जात आहे.

यामुळे नागरिकांना बँकेत जाऊन रांगेत थांबण्याची गरज ही भासणार नाही. असे असले तरी सीडीएम मशीन हे बहुतांश वेळा हे शहरी भागात आढळून येत असतात. ग्रामीण भागात केवळ एटीएममशीन या असतात. यामुळे ग्रामीण भागात ज्यांच्याकडे दोन हजारांच्या नोटा या आहेत त्यांना त्या जमा करण्यासाठी बँकेतच जावे लागणार आहे.

Exit mobile version