Download App

Letsupp ground survey : दोन हजाराची नोट… “आम्ही नाही घेत”

पुणे : आरबीआयने दोन हजाराची नोट ही चलनातून बाद केली आहे. सप्टेंबरनंतर २ हजारांची नोट ही चलन म्हणून स्वीकारली जाणार नाही. आरबीआयच्या निर्णयानंतर नागरिक आपल्याजवळ असलेल्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकांकडे धाव घेत आहे एकीकडे हे सुरु असताना दुसरीकडे मात्र व्यवहारासाठी दोन हजाराची नोट ही दुकानदार तसेच व्यापाऱ्यांकडे घेऊन गेले असता त्यांच्याकडून ही नोट स्वीकारण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे समोर आले आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नुकताच एक मोठा व महत्वाचा निर्णय घेतला आहे. आरबीआयने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आरबीआयने इतर बँकांना 2 हजार रुपयांच्या नोटा जारी करणे थांबवा, असा सल्लाही दिला आहे. नागरिकांकडे असलेल्या दोन हजारांच्या या नोटा त्यांना 30 सप्टेंबरपर्यंत बँकेत जमा करता येतील, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत नागरिकांना या नोटा बँकेतून बदलून घेता येतील. आरबीआयने असे स्पष्ट निर्देश दिल्यानंतरही काही छोटे- मोठे व्यापारी पैसे सुट्टे नसल्याचे कारण देत नोट स्वीकारण्यास नकार देत असल्याचे समोर आले आहे.

आम्ही नोट घेतच नाही…
दोन हजारांची नोट चलनबाह्य झाल्यांनतर नागरिकांसह व्यापारी देखील संभ्रमात सापडले आहे. याबाबत लेट्सअपने एक ग्राउंड सर्व्हे केला यामध्ये हे उघड झाले आहे. एका हॉटेल चालकाकडे गेले असता बिलाची रक्कम देताना दोन हजारांची नोट दिली. मात्र आम्ही दोन हजारांची नोट स्वीकारतच नाही असे हॉटेल चालक यांनी स्पष्ट केले. तसेच सुटते पैसे नसल्याचे कारण देत चलन स्वीकारण्यास नकार दिला जातो आहे.

दरम्यान यदा कदाचित दोन हजारांची नोट स्वीकारली तर एक हजाराची खरेदी करा तेव्हा दोन हजारांची नोट स्वीकारली जाईल असे व्यापारी बोलू लागले आहे. तसेच सुट्टे पैसे नसल्याचे कारण देत दुकानदारांकडून नोट स्वीकारण्यास नकार दिला जातो आहे. काही ठिकाणी तर दोन हजारांची नोट दाखवली तरी लगेच समोरून नकार दिला जातो आहे. आरबीआयने दोन हजारांची नोट ही बाद केली आहे मात्र बँकांकडून या नोटा 30 सप्टेंबर पर्यंत स्वीकारल्या जात आहे.

Tags

follow us