Relief for Vikas Lawande Bail granted in case of objectionable statement against Warkari Sampraday : राज्यातील राजकारणात चर्चेत असणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना वारकरी संप्रदायाबद्दल आक्षेपार्ह विधान प्रकरणात पोलिसांनी अटक केली होती. मात्र अखेर त्यांना जामीन मंजूर झाला आहे.
विकास लवांडे यांना ३० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. लवांडे यांना आज दुपारी पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्यावेळी न्यायालाने दिलेल्या निर्णयामध्ये त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. पुण्यातील वाघोली पोलिसांनी विकास लवांडे यांना अटक केली होती. वारकरी संप्रदायाबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल लवांडे यांच्यावर वाघोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटकेनंतर त्यांची रवानगी येरवडा जेलमध्ये झाली होती.
मोठी बातमी! मंत्री संजय राठोड यांच्या मंत्रालयातील कार्यालयातून 80 हजार चोरीला..
दुसरीकडे विकास लवांडे यांनी एक्सवर पोस्ट करत या प्रकरणात आपली भूमिका व्यक्त करत राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. एका खोट्या फिर्यादीवरुन पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे असं विकास लवांडे यांनी या पोस्टमध्ये म्हटले होतं. विकास लवांडे (Vikas Lawande) यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे की, माझ्यावर जीवघेणा हल्ला करणारे गुंड संग्राम भंडारे व इतर सर्व आरोपी मोकाट असून वाघोली पोलीस स्टेशनचे (Wagholi Police Station) पोलिस एका खोट्या फिर्यादीवरून कसलाही पुरावा नसताना मला अटक करण्यासाठी मला फोन न करता रात्री घरी आले मी घरी नव्हतो.
कृषीप्रधान देश म्हणतात अन् शेतकऱ्यांच्याच शेतमालाला भाव नाही… अण्णा हजारे
कुटुंबीयांना माझ्या अटकेबाबत निरोप दिला कुटुंबांना घाबरवण्याचा हा प्रयत्न होता काय ? असा माझा सवाल आहे ? पोलीस मला फोन करू शकले असते. मी फरार नाही किंवा माफीवीर नाही. शासनाने मला जरूर अटक करावी मी पोलिसांना सहकार्य करणारा माणूस आहे कारण मी कायदा पाळणारा माणूस आहे कायदा हातात घेणारा माणूस नाही. सत्यासाठी लढत राहणार सत्याग्रही पद्धतीने जामीन , वकील ,दंड देणार नाही. पुणे पोलिसांनी मला जरूर अटक करावी मी तयार आहे. आता मला पुण्यातून पोलीस #वाघोली पोलीस स्टेशनला घेऊन चाललेले आहेत.
