Download App

मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळ कुठंही नाही; नुकसानग्रस्तांच्या मदतीबद्दल मुख्यमंत्र्यांची महत्वाची माहिती

शेतकऱ्यांच जे काही नुकसान झालं, त्याचा आढावा आम्ही घेतला. 60 लाख हेक्टरवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

  • Written By: Last Updated:

आज मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. (Rain) यामध्ये विशेषत: मागच्या काही महिन्यात महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली, शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालं, त्याचा आढावा घेण्यात आला आहे. 60 लाख हेक्टरवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यापैकी पहिल्या टप्प्यातील ऑगस्टपर्यंतच नुकसान होतं, त्यासाठी राज्य सरकारने 2215 कोटी रुपयाचं वितरण चालू केलं आहे. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

त्याचबरोबर पुढच्या दोन-तीन दिवसात सगळ्या प्रकारची माहिती आमच्यापर्यंत पोहोचेल. काही ठिकाणी पाणी असल्यामुळे असेसमेंट घेता येत नव्हतं. काही ठिकाणी शेतकऱ्यांची जमीन खरडून गेलेली आहे. घर, विहिरी गेल्या आहेत. शेतकऱ्यांच ज्या-ज्या प्रकारच नुकसान झालेलं आहे, त्या संदर्भात सर्वसमावेशक पॉलिसी तयार करुन पुढच्या आठवड्यात घोषणा करु.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा; जिल्हा वार्षिक योजनेतील निधीतून मिळणार मदत

सगळी मदत शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यात मिळाली पाहिजे यासाठी प्रयत्न करु असंही फडणवीस यावेळी म्हणाले आहेत. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. पण मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळ कुठेही नाही. ओला दुष्काळ आतापर्यंत कधी जाहीर झालेला नाही. ज्यावेळी दुष्काळ पडतो, त्यावेळी ज्या सवलती, उपायोजना केल्या जातात.

तशाच प्रकारच्या सवलती दुष्काळी टंचाई पडली आहे, असं समजून यावेळी सुद्धा सवलती लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्याचा अर्थ तोच असतो. नुकसानीची आकडेवारी जमा होत आहे. पुढच्या आठवड्यात मी, शिंदे साहेब, अजितदादा बसून निर्णय घेणार आहोत, घोषणा करणार आहोत असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

follow us