छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhaji Nagar ) औरंगजेबाची कबर काढून टाका, अशी मागणी शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केला आहे. तसेच, या मागणीसाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्रदेखील लिहिणार असल्याचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी यावेळी सांगितले आहे.
शरद पवारांकडून चंद्रकांत पाटलांचा पाणउतारा; म्हणाले, ‘शहाण्या माणसाबद्दल विचारा…’
छत्रपती संभाजीनगर नामांतराविरोधात खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jalil) यांनी आंदोलन सुरू केले आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगरमधील राजकीय वातावरण पेटलेले असतानाच शिवसेनेने यावर आक्रमक प्रतिक्रिया दिली. शिवसेनेचे नेते संजय शिरसाट म्हणाले की, जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर झाल्याने याचा सर्वात जास्त दु:ख हैदराबादींना झाले आहे. यामुळे असे लोक उपोषणाच्या नावाखाली संपूर्ण शहराला वेठीस धरण्याचे काम करत आहे.
आमदार संजय शिरसाट म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाविरोधात लढा दिला. यामुळे जिल्ह्याचे नाव बदलणे म्हणजे अत्याचारी औरंगजेब विरोधातील हा लढा असणार आहे. शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर होणे आमच्याकरिता अभिमानास्पद बाब आहे. काही जणांना याचे वाईट का वाटत आहे ? तुम्ही काय औरंगजेबाचे वंशज आहात का ? असा खोचक टोला संजय शिरसाट यांनी केला. आम्हाला छत्रपती संभाजीनगरमध्ये औरंगजेबाच्या कबरीचे अवशेषही नको. यामुळे खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर काढून टाकावी, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करणार आहोत.
माजी आमदार प्रदीप जैस्वाल म्हणाले की, एमआयएमचे नेते सध्या मर्यादा सोडून बोलत आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे अधिकृत नाव झाल्याने काही जणांना पोटदुखी होऊ लागली. यामुळे त्यांनी उपोषण सुरू केले. या आंदोलनात औरंगजेबाची पोस्टर झळकावले जात आहे. यामुळे भविष्यात कायदा सुव्यवस्था बिघडू शकते. असे काही झाल्यास आम्ही बाळासाहेबांनी शिकवल्याप्रमाणे शिवसेना स्टाईल जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा आमदार संजय शिरसाट यांनी दिला.