Download App

अगोदरच्या मंत्र्यांना हटवून आम्हाला मंत्री करा, शिवसेनेच्या आमदारांची शिंदेंकडे मागणी

  • Written By: Last Updated:

Big revelation from Sanjay Shirsat : राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या सरकारमधील समावेशानंतर शिवसेनेत कमालीची अस्वस्थता पसरली आहे. याच अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknatha Shinde) शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत शिवसेनेच्या नाराज आमदारांनी मंत्रिपदाची मागणी केली आहे. शिवसेनेच्या अगोदरच्या मंत्र्यांना हटवून आम्हाला मंत्री करा अशी मागणी आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. आम्हीही बंड केलं मग आम्हाला का मंत्रिपद नाही असा सवाल यावेळी या आमदारांनी केला.

राष्ट्रवादीच्या वाट्याला 9 मंत्रिपद गेल्याने आता शिवसेनेला मंत्रिपद मिळणार नाही. म्हणून या आमदारांनी ही मागणी केली. परंतु या बातम्या चुकीच्या आहेत. अजित पवारांच्या एन्ट्रीमुळे शिवसेनेच्या आमदारांमध्ये थोडी नाराजी असल्याचे संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी सांगितले जेव्हा दोघात तिसरा येतो तेव्हा पहिल्यांमध्ये नाराजी येणे हे सहाजीक आहे असे देखील यावेळी शिरसाट म्हणाले. (Remove previous ministers and make us ministers, Shiv Sena MLAs demand from Shinde)

वाट निवडली, काटे सहन करावेच लागणार; अजित पवारांच्या एन्ट्रीने नाराज शिवसेनेला बच्चू कडूंचा सल्ला

अजित पवार यांच्या एन्ट्रीनंतर शिवसेनेचे आमदार नाराज असल्याचे चित्र आहे. ही नाराजी आज काही आमदार आणि मंत्र्यांनी शिंदे यांच्याकडे उघडपणे व्यक्त केली. तसंच “आम्हाला बोलायचं आहे” असं म्हणत अनेक आमदारांनी शिंदे यांच्याकडे भेटीची वेळ मागितली आहे. संजय शिरसाट यांच्यासारख्या आमदारांनी आपल्या मनातील खदखद थेट मीडिया समोर मांडली.

दरम्यान, उद्धव ठाकरेंनी साद दिली तर त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊ, असं म्हणत शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आणि मंत्री शंभुराज देसाई यांनी खळबळ उडवून दिली आहे. साम वृत्तवाहिनीशी बोलताना देसाई म्हणाले, सादला प्रतिसाद देऊ आम्ही. मात्र अद्याप त्यांच्याकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही, तसा प्रस्ताव आल्यास त्यावर नक्की सकारात्मक विचार करु, असे सूचक विधान त्यांनी केले होते.

Tags

follow us