आजपासून राज्यभरातील निवासी डॉक्टर संपावर

मुंबई : अनेक प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या मार्डने आज सोमवार, २ जानेवारीपासून राज्यव्यापी संप पुकारला आहे. त्यामुळे नव्या वर्षात आरोग्यसेवा कोलमडण्याचा धोका निर्माण झाला आहे. संप अशा काळात पुकारण्यात आला जेव्हा पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. दरम्यान ही स्थिती टाळण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. राज्यातील निवासी डॉक्टरांच्या संघटनेच्या वतीने […]

Untitled Design (12)

Untitled Design (12)

मुंबई : अनेक प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या मार्डने आज सोमवार, २ जानेवारीपासून राज्यव्यापी संप पुकारला आहे. त्यामुळे नव्या वर्षात आरोग्यसेवा कोलमडण्याचा धोका निर्माण झाला आहे. संप अशा काळात पुकारण्यात आला जेव्हा पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. दरम्यान ही स्थिती टाळण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे.

राज्यातील निवासी डॉक्टरांच्या संघटनेच्या वतीने काही दिवसापूर्वीच महाराष्ट्र शासनाला इशारा दिला होता. त्यांच्या महत्त्वाच्या मूलभूत मागण्या त्वरित मान्य करा अन्यथा काम बंद आंदोलन करू. राज्य शासनाला इशारा देण्यात आल्यानंतरही कोणतीही पाऊले उचलण्यात आली नाही. अखेर आजपासून राज्यातील हजारो निवासी डॉक्टर संपावर जाणार आहेत.

नेमक्या काय आहेत मागण्या? :
सहयोगी आणि सहाय्यक प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरणे
सर्व वरिष्ठ निवासी डॉक्टरांना समान वेतन द्यावे
मोडकळीस आलेल्या वसतीगृहामुळे विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड थांबवावी
महागाई भत्ता तात्काळ अदा करण्यात यावा

शासनाला इशारा, अन्यथा….
मुख्यमंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करू नये. आणि शासन स्तरावरून लवकरात लवकर मागण्या मार्गी लावाव्या. अन्यथा आम्हा निवासी डॉक्टरांना कठीण पावले उचलत आपत्कालीन सेवा बंद करावी लागेल,असा इशारा निवासी डॉक्टर संघटनेकडून देण्यात आला आहे.

Exit mobile version