गोकुळचा गड महायुती राखणार की सतेज पाटील सत्तांतर घडवणार? संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष कोल्हापूरच्या निकालाकडे!

आज, 19 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार असून, गोकुळच्या सत्तेच्या चाव्या नेमक्या कोणाच्या हातात जाणार, याचा फैसला होणार आहे.

Untitled Design   2026 10 19T085554.390

Untitled Design 2026 10 19T085554.390

Results of the Gokul Milk Union election in Kolhapur today : महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रातील प्रतिष्ठेची आणि संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेली गोकुळ दूध संघाची निवडणूक आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या संचालक मंडळासाठी 18 ऑक्टोबर रोजी विक्रमी मतदान पार पडलं. आता आज, 19 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार असून, गोकुळच्या सत्तेच्या चाव्या नेमक्या कोणाच्या हातात जाणार, याचा फैसला होणार आहे. महायुतीच्या छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीला यश मिळणार की आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी बाजी मारणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील 12 तालुक्यांमधील 35 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत एकूण 5 हजार 418 पात्र मतदार होते. त्यापैकी 5 हजार 416 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे तब्बल 99.96 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील 12 पैकी 10 तालुक्यांमध्ये शंभर टक्के मतदान झालं आहे.

संचालक मंडळाच्या 25 जागांसाठी एकूण 50 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे प्रत्येक जागेसाठी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. आज रमणमळा येथे मतमोजणी होणार असून, त्यासाठी एकूण 35 टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतमोजणीच्या प्रक्रियेनंतर दुपारपर्यंत निकालाचं चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

ग्वाल्हेरमध्ये भरधाव अनियंत्रित ट्रकचा कहर! 15 जणांचा मृत्यू, 28 जखमी, आठ पोलीस कर्मचारी निलंबित

गोकुळच्या सत्तेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये प्रतिष्ठेची लढत पाहायला मिळत आहे. महायुतीच्या छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीसमोर काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीचं आव्हान आहे. या निवडणुकीत सतेज पाटील यांनी माजी खासदार राजू शेट्टी आणि माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर यांना सोबत घेत राजकीय ताकद पणाला लावली आहे.

गोकुळची निवडणूक केवळ राजकीय लढतीमुळेच नव्हे, तर विविध वादांमुळेही चर्चेत राहिली आहे. पात्र-अपात्र संस्थांचा प्रश्न, प्रशासक नियुक्तीचा मुद्दा आणि मतदानापूर्वी ठरावधारकांना सौंदत्ती येथे नेऊन यल्लमा देवीसमोर शपथा घेतल्याच्या आरोपांमुळे वातावरण तापलं होतं.

ठरावधारकांवर मतदानासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. यासंदर्भात मंत्री हसन मुश्रीफ यांचा कथित व्हिडिओही चर्चेत आला. आमदार सतेज पाटील यांनी या प्रकारावर आक्षेप घेत संबंधित प्रकरणात कारवाईची मागणी केली. खासदार सुप्रिया सुळे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली, तर बेळगावमधील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केल्याची माहिती समोर आली.

MGM मेडिकल कॉलेजच्या केंद्रात २१५ विद्यार्थी आणि स्टाफ HIV पॉझिटिव्ह? आकडेवारी काय सांगते?

एकीकडे विक्रमी मतदान, तर दुसरीकडे आरोप-प्रत्यारोप आणि राजकीय प्रतिष्ठेची लढाई, अशा पार्श्वभूमीवर गोकुळच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. २५ संचालकांच्या जागांवर कोण बाजी मारणार? महायुती आपली सत्ता कायम राखणार की सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सत्तांतर घडवणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं आज मतमोजणीनंतर मिळणार असून, गोकुळच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

Exit mobile version