Richa Kulkarni first in state In Civil Judge : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) आणि जेएमएफसी यांनी घेतलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा 2022 चा निकाल जाहीर झाला. या परिक्षेत बीडची (Beed) ऋचा विठ्ठल कुलकर्णी (Richa Kulkarni) ही राज्यात पहिली आली आहे. विशेष म्हणजे पहिल्या 10 गुणवंतांमध्ये नऊ मुलींचा (Civil Judge) समावेश आहे.
ही परीक्षा 2022 ची परीक्षा लांबणीवर पडली होती, कोरोनानंतर 9 सप्टेंबर 2023 रोजी पूर्ण परीक्षा झाली होती. 24 ऑगस्ट 2024 रोजी मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. यातील 343 उमेदवारांची मुलाखतीसाठी निवड झाली, 17 ते 29 मार्च 2025 या काळात मुलाखती पार पडल्या. शनिवारी अंतिम निकाल जाहीर झाला आहे. 114 जणांची दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पदासाठी निवड करण्यात आली आहे.
पहिल्या 10 टॉपर्स मध्ये नऊ मुली आहेत. हे या निकालाचे वैशिष्ट्य आहे. पहिल्या दहा टॉपर्समध्ये नऊ मुली आहेत. बीडची ऋचा विठ्ठल कुलकर्णी हिने पहिल्याच प्रयत्नात मोठे यश मिळविले. ऋचा कुलकर्णी राज्यात पहिली आली आहे. तिचे वडील हे पिग्मी एजंट म्हणून गेली 35 वर्षापासून पूर्णवादी बँकेत पिग्मी एजंट म्हणून काम करतात. 100 रुपयाला 2 टक्के कमिशन त्यांना मिळतं. त्यातूनच आपली उपजीविका विठ्ठल कुलकर्णी हे भागवतात.
तनिषा भिसे मृत्यूप्रकरणी दीनानाथ मंगेशकर रूग्णालयच दोषी; सरकारी समितीचा अहवाल शासनाला सादर
याविषयी ऋचा म्हणते, मला आकाश ठेवणं झालंय. माझ्या यशामध्ये माझे आई-वडील माझे भाऊ आणि गुरुजन यांचा सर्वांचा वाटा आहे. या परीक्षेचा मी पुण्यामध्ये अभ्यास केला. एलएलबी झाल्यानंतर मला सरकारी नोकरी करायची होती आणि स्वतःच्या पायावर उभे राहायचं होतं. माझे वडील पूर्णवादी नागरी सहकारी बँकेमध्ये पिग्मी एजंट म्हणून काम करतात. आई बालवाडीमध्ये शिक्षिका म्हणून काम करत होती, शिक्षणासाठी मला जे पैसे लागायचे त्याच्यासाठी अडचणी यायच्या. मात्र बारावीनंतर मला रिलायन्स फाउंडेशनची शिष्यवृत्ती मिळाली. त्यातूनच माझे एलएलबी चे शिक्षण पुर्ण झाले. पुण्यासारख्या शहरात राहणं सोपं नाही, त्या ठिकाणी दहा ते पंधरा हजार रुपये खर्च महिन्याला येतो. त्यातून मला आई आणि वडील पैसे पाठवायचे. अत्यंत काटकसरीने पैशाचा वापर करायचा. वडील कशा पद्धतीने हे सर्व करत होते, हे मी पाहिलं होतं. विशेष म्हणजे पिग्मी एजंटला काय त्रास होतो, 100 रुपयासाठी कितीतरी वेळ थांबावं लागतं. मी माझ्या आई-वडिलांचा फोटो माझ्यासोबत कायम ठेवायचे. त्यामुळे माझे आई-वडील काय करत आहेत, हे मला त्याच्यातून दिसायचं आणि त्याच्यातूनच मी अभ्यास करायचे.
माझं दहावीच्या शिक्षण बीड शहरात झाले आहे. पुण्यासारख्या मॉडर्न सिटीमध्ये आपण टिकू शकु का? हा न्युनगंड असतो. आपला अभ्यास हीच आपली ताकत असते. मला इंग्रजी बोलता येत नव्हते, मात्र आता मी शिकले आहे. हुशारी आणि मेहनत जर बरोबर असेल तर नक्कीच यश मिळतं. आपण जेव्हा बीड जिल्ह्यामधून येतो, तेव्हा हे सर्व स्ट्रगल करावे लागतात. आपले आई-वडील काय करतात, हे आपण पाहिलं पाहिजे माझं स्वप्न होतं की, माझ्या आई वडिलांचे कष्ट मला कमी करायचं आहे, असं ऋचा विठ्ठल कुलकर्णी म्हणते.
बीड शहरातील लोकांनी मला फार सहकार्य केलं. माझ्यावर त्यांचे फार उपकार आहेत. मुलगी न्यायाधीश झाली. वडिलांचा कंठ दाटून आला. मी पस्तीस वर्षापासून पिग्मी एजंट म्हणून काम करतो. एक-एक, दोन-दोन रुपये या ठिकाणी गोळा करतो. मी कुणालाही धोका दिला नाही. मी आतापर्यंत केलेल्या कष्टाचा चीज झालं. माझ्या मुलीनं माझ्या कष्टाचा चीज केलं, असं सांगताना वडिलांचा कंठ दाटून येत होता.
काय सांगता! 25 वर्षांचं कर्ज फक्त 10 वर्षांत होईल क्लिअर; ‘या’ सोप्प्या टिप्स फॉलो कराच
मुलगी न्यायाधीश झाली हे सांगताना आईला अश्रू अनावर झाले. आम्ही अनेक ठिकाणी नोकरी केल्या आणि कामं केली. मात्र, चांगली काम केली कुणालाही धोका दिला नाही. त्यामुळे त्या कामाचं चीज या ठिकाणी झाल्याच्या पाहायला मिळते. जे काम माझ्या मुलीने केले, ते सर्व मुलींनी करावं, चांगलं राहावं, असं देखील ऋचाच्या आईने म्हटलं आहे.
माझ्या मुलाने केलेल्या कष्टाचं चीज झालं. आम्ही दारिद्र्यांमध्ये कितपत पडलो होतो, त्याचं चीज झालं. आता समाधान वाटतंय. माझ्या मुलांना केलेल्या कष्टाचा चीज आणि नातीने केलेला कष्टाचं चीज झालं. माझ्या डोळ्यांनी कधीही मी नाही पाहिलेली ही गोष्ट आज मला पाहायला मिळाली. काही लोकांनी माझ्या मुलाची किंमत केली नाही, माझी बी किंमत केली. तरी मी कधीही हार मानली नाही, कुणी बोललं नाही तरीही आपलं काम करत राहायचं. पुढे चालत राहायचं, हे ठरवलं होतं. त्याच्याच यशाचं फळ आज आम्हाला मिळालंय, अशा भावना ऋचाची आजी ललिता कुलकर्णी यांनी व्यक्त केल्या आहेत.