Rohit Pawar aggressive agains MPSC online exam focus on students after farm loan waiver : सरकारने शेतकऱ्यांना सरसकट (Rohit Pawar) दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर केली आहे. परंतु त्यामध्ये सरकारने अट घातली होती. त्याविरूद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन केले होते. त्याला यश आले. सरकारने ती अट मागे घेतली आहे.
त्यानंतर आता राज्यसेवा आयोगाच्या ऑनलाईन परीक्षा (CBT) पद्धतीविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा (CBT) पद्धतीबद्दलची मागणी मान्य न झाल्यास सरकारला पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे.
नेमकं कायम म्हणाले रोहित पवार?
राज्यसेवा आयोगाने मनमानीपणे लादलेल्या ऑनलाईन परीक्षा (CBT) पद्धतीविरोधात विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष असून वारंवार वेगवेगळ्या माध्यमातून विरोध करूनही पाठपुरावा करूनही आयोगाने विद्यार्थ्यांची दखल घेतलेली नाही. सरकारने त्वरित निर्णय घ्यावा अन्यथा विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय राहणार नाही.
एवढ्या 8-10 दिवसात सरकारने आणि आयोगाने निर्णय न घेतल्यास मी स्वतः विद्यार्थ्यांच्या लढ्यात विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावर उतरेन. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा लढा यशस्वी झाला आता पुढचा लढा स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी…! असं म्हणत रोहित पवारांनी एमपीएसीच्या ऑनलाईन परीक्षेविरूद्ध सरकारला पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे.
