Rohit Pawar On Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून राजकीय अस्थिरता कमालीची ताणली गेली आहे. कोण कुठे जाणार याचा नेम नाही. मग त्याचे नाव काहीही असो. आपण विचाराल व्हाट इज़ युवर नेम? समोरून उत्तर येतो आपल काही नेम नाही. अशीच अवस्था आणि संशयाचे धुके महाराष्ट्रच्या राजकारणात झाले आहे.
अनेक कार्यकर्ते आणि समर्थकाना आपला नेता मुख्यमंत्रीच्या खुर्चीवर बसलेला दिसतोय. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर एकनाथ शिंदे थेट मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर जाऊन बसले. अनेकांसाठी जसा हा धक्का होता तसा तो शिंदे यांच्यासाठी ही धक्काच होता. राजकारणात काहीही होऊ शकत हे नक्की. या घटनेपासून अनेकाना राजकारणात काहीही होऊ शकते अस वाटू लागले आहे.
ही चर्चा बरेच दिवस झाल्यानंतर अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्री या आशयाचे बॅनर लागले. पक्षांतर्गत स्पर्धा हा अंदाज बांधत असताना ही चर्चा काही दिवसानंतर थांबली. आता अजित पवार हे नाराज असणे, पक्षातून बाहेर पाडण्याच्या बातम्या सुरु झाल्या. कार्यकार्यांनी थेट अजित दादा भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले. अजित पवारांमध्ये मुख्यमंत्री बनण्याची क्षमता आहे. ते मुख्यमंत्री बनले तर महाराष्ट्राला फायदाच होईल, असं विधान रोहित पवारांनी केलं, ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
Amol Kolhe : उदयनराजे भोसलेंचा पाठिंबा पण सगळ्याच गोष्टी राजकारणात आणल्या तर…
तिकडे जयंत पाटील यांच्या सांगलीत खासदार अमोल कोल्हे यांनी जयंत पाटील यांना भावी मुख्यमंत्री म्हणून जाहीर संबोधले. तिकडे मुख्यमंत्री पदाच्या रेस मध्ये आलेले विखे पाटील देखील मागे नाहीत. त्यांचे जवळचे नेते मंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील विखे पाटील यांना भावी मुख्यमंत्री म्हणून जाहीर करुन टाकले. अशी एकंदरीत राजकीय स्थिती असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
रोहित पवार म्हणाले, “अजित पवारांना मुख्यमंत्रीपद मिळालं, तर महाराष्ट्राला फायदाच होईल. कारण आजच्या नेत्यांच्या तुलनेत अजित पवारांची प्रशासनावर मजबूत पकड आहे. त्यामुळे कुठलंही काम लवकरात लवकर कसं होईल आणि सामान्य लोकांना न्याय कसा मिळेल? हे आपण अजित पवारांकडून शिकू शकतो. हे समीकरण महाराष्ट्रात बसवायचं असेल तर महाविकास आघाडीचे सर्व नेते आणि पक्ष एकत्र बसून हे ठरवतील. त्यानंतर त्याची अंमलबजावणी केली जाईल. आमदार किंवा एक कार्यकर्ता म्हणून मला विचारलं तर मी एवढंच सांगेन अजित पवारांमध्ये मुख्यमंत्री बनण्याची नक्कीच क्षमता आहे.”