Rohit Pawar On Pune Police : पुणे पोलीस आयुक्त साहेब, माझ्यावर गुन्हे नोंद करा; रोहित पवार पुणे पोलिसांवर भडकले

Rohit Pawar On Pune Police :  राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार  यांच्या नेतृत्वात पुण्यात एमपीएससी अध्यक्ष विवेक भीनमवार

Rohit Pawar On Pune Police

Rohit Pawar On Pune Police

Rohit Pawar On Pune Police :  राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार  यांच्या नेतृत्वात पुण्यात एमपीएससी अध्यक्ष विवेक भीनमवार यांच्या राजीनाम्याची मागणी करत एमपीएसी विद्यार्थी आंदोलन करत आहे. आतापर्यंत पुणे पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या 15 विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. पुणे पोलिसांच्या या कारवाईवर प्रश्न उपस्थित करत रोहित पवार यांनी पुणे पोलिसांवर गंभीर आरोप केले आहे. पुणे पोलिसांना खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेल तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करुन माझ्यावर गुन्हे नोंद करा असं आव्हन देखील रोहित पवार यांनी पुणे पोलिसांना दिलं आहे.

नेमकं काय म्हणाले रोहित पवार? 

पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार?

विद्यार्थ्यांच्या सत्याग्रहाला 1 ऑक्टोबर रोजी सुरुवात झाली. त्या दिवशी इंदुलाल कॉम्प्लेक्सजवळ पेपरफुटी समोर आणणारा ऋषिकेश गांगुर्डे याच्यासह ओमकार पाटील, गजानन शेळके, सोमनाथ चव्हाण आणि संकेत कणसे उपस्थित नसताना, ते गावी असतानादेखील त्या दिवशी इंदुलाल कॉम्प्लेक्सजवळ पोलिसांना कसे दिसले?

विद्यार्थ्यांचे वर्णन करताना प्रमोद पाटील यांचे लिंग महिला दाखवले आहे, तर प्रियांका चौधरी यांचे लिंग पुरुष दाखवले आहे. FIR मध्ये इतक्या चुका??  हे सर्व पाहता, FIR करणारा अधिकारी पेपर फोडून आला की काय, असा प्रश्न पडतो…

असो, वरून मालकाचे आदेश ऐकून पोलीस वागायला लागले की असेच होते. हे विद्यार्थ्यांवरील सरकारचे दबावतंत्र आहे. पण या दबावाला विद्यार्थी घाबरणार नाहीत. हे सर्व गुन्हे जामीनपात्र असून, वकिलांची मोठी फौज आम्ही उभी केली आहे. त्यामुळे सरकारने असे खोटे गुन्हे दाखल करण्यापेक्षा भ्रष्ट भीमनवारला पदावरून हाकलावे. तो सरकारचा जावई आहे का?

खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा!

Toyota Fortuner Leader Edition लॉन्च; सिग्नेचर फ्रंट ग्रिलसह भन्नाट फीचर्स; जाणून घ्या किंमत…

Exit mobile version