आज सकाळपासून सरकारी तेल कंपन्यांनी मार्च महिन्याच्या पहिल्याच तारखेला गॅस सिलिंडरच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत. त्यानुसार घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सामान्य ग्राहकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. गॅस दरवाढीच्या याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एक ट्विट करून खोचक टीका केली आहे.
रोहित पवार यांनी गॅस दरवाढीची बातमी शेअर करत “आज सकाळची क्कडक बातमी… घरगुती सिलेंडरच्या दरात ₹५० तर व्यावसायिक सिलेंडरच्या दरात ३५०₹ वाढ.. उन्हाच्या तडक्यात महागाईचा भडका…” असं कॅप्शन लिहलं आहे.
आज सकाळची क्कडक बातमी…
घरगुती सिलेंडरच्या दरात ₹५०
तर व्यावसायिक सिलेंडरच्या दरात ३५०₹ वाढ..उन्हाच्या तडक्यात
महागाईचा भडका… pic.twitter.com/MsrEO4OV9U— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 1, 2023
हेही वाचा : Live Blog | Thackeray Vs Shinde : सलग दुसऱ्या दिवशी शिंदे गटाकडून युक्तिवाद
आज सकाळी जाहीर केलेल्या नव्या किंमतीनुसार घरगुती गॅस (LPG Gas) सिलिंडरचे दर ५० रुपयांनी वाढवण्यात आले आहेत. त्यानुसार मुंबईत १४.२ किलोच्या घरगुती सिलिंडरची किंमत आता १ हजार १०२ इतकी झाली आहे. बुधवारी सकाळपासून घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ झाल्याने शहरातील लाखो ग्राहकांवर खर्चाचा बोजा वाढला आहे. सध्या मुंबईत LPG सिलिंडरची किंमत १ हजार ५२ रुपये प्रति युनिट इतकी होती.