Download App

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरवर नवी जबाबदारी, निवडणुक आयोगाचा नॅशनल आयकॉन म्हणून नियुक्त

  • Written By: Last Updated:

Sachin Tendulkar : क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) क्रिडा विश्वातून निवृत्त होऊन दहा वर्षे उलटले तरी त्यांची क्रेझ कायम आहे. त्यामुळंचं भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) सचिन तेंडुलकर यांना मतदारांना मतांचे महत्त्व पटवून देण्यासाठी, ‘राष्ट्रीय आयकॉन’ म्हणून नियुक्त केलं आहे.

नवी दिल्लीतील आकाशवाणी रंगभवन येथे भारतीय निवडणूक आयोगातर्फे आयोजित कार्यक्रमात सचिन तेंडुलकर यांच्यासी पुढील ३ वर्षांसाठी सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे, अरुण गोयल यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

देशातील आगामी निवडणुकांमध्ये, विशेषत: 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात मतदारांचा निवडणुकीतील सहभाग वाढवण्यासाठी तेंडुलकर यांच्या प्रभावाचा सकारात्मक लाभ व्हावा, यासाठी आयोगाने तेंडूलकर यांना नॅशनल आयकॉन म्हणून नियुक्त केलं.

Pune Crime : फिल्मी स्टाईलने गोळ्या झाडून तरुणाची हत्या, पिंपरी-चिंचवडमधील घटना.. 

यावेळी बोलतांना सचिन तेंडुलकर म्हणाले की, भारतासारख्या चैतन्यशील लोकशाहीसाठी राष्ट्र उभारणीत तरुणांची भूमिका महत्त्वाची आहे. क्रीडा सामन्यादरम्यान देशाचा जयजयकार करत ‘भारत… भारत’ असा जयघोष करणारी टीम इंडिया समृद्ध लोकशाही पुढे नेण्यासाठी नक्कीच पुढे येईल. स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी जशी गर्दी जमते, तशाच प्रकारे मतदान केंद्रावरील गर्दी आणि मतदानाचे कर्तव्य बजावण्याचा उत्साह प्रत्येक निवडणुकीत कायम राहावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. देशाच्या कानाकोपऱ्यातील तरुण मतदार जेव्हा निवडणुकीत सहभागी होतील, तेव्हाच आपला देश समृद्धीकडे वाटचाल करेल, असं त्यांनी म्हटलं.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यावेळी म्हणाले की, सचिन तेंडुलकर हे केवळ भारताचेच नव्हे तर जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित खेळाडू व्यक्तिमत्व आहे. त्यांची संपूर्ण क्रिकेट कारकीर्द प्रशंसनीय आणि उल्लेखनीय आहे. त्यांना नॅशनल आयकॉन म्हणून नियुक्त केलं. आता आगामी तीन वर्षांमध्ये तेंडुलकर हे विविध टेलिव्हिजन टॉक शो, कार्यक्रम आणि डिजिटल मोहिमांद्वारे मतदारांमध्ये मतदानाचा प्रसार-प्रसार करतील. यामाध्यमातून मतदारांना मतदानाचे महत्त्व आणि देशाच्या भवितव्यासाठी ते किती महत्त्वाचे आहे, हे मतदारांना पटवून देतील.

Tags

follow us