Download App

साहित्य अकादमी पुरस्काराची घोषणा : सुधीर रसाळ यांच्या ‘विंदांचे गद्यरूप’ या पुस्तकाचा अकादमीकडून सन्मान

यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार डॉ. सुधीर रसाळ यांना त्यांच्या विंदांचे गद्यरूप या समीक्षात्मक ग्रंथासाठी जाहीर झाला आहे.

  • Written By: Last Updated:

Sahitya Akademi Award 2024 Announcement : साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठेचा समजल्या जाणाऱ्या साहित्य अकादमी (Sahitya Akademi) पुरस्कारांची नुकतीच घोषणा झाली. साहित्य अकादमीने 21 भाषांमधील वार्षिक साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर केले. यात ज्येष्ठ मराठी समीक्षक सुधीर रसा (Sudhir Rasal) यांच्या ‘विंदांचे गद्यरूप’ या पुस्तकालाही पुरस्कार जाहीर झाला. रसाळ यांना हा पुरस्कार जाहीर होताच साहित्य क्षेत्रातून त्यांंच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय.

भेगडेंची घरवापसी झाल्यास दोन पाऊलं मागे येणार; सुनिल शेळकेंनी क्लिअर सांगितलं 

हा पुरस्कार मिळाल्यानंतर सुधीर रसाळ यांनी आपल्या भावना व्यक्त करताना या पुरस्कारने मला माझ्या आयुष्यातील सर्वात जास्त समाधान दिल्याचं सांगितलं. आजवर मोठमोठे समीक्षक आणि विचारवंतांना हा पुरस्कार दिला गेलाय, तेव्हा अशा मोठ्या माणसांसोबत आपलं नाव जोडलं गेलंय, याचा आनंद आहे, असं रसाळ म्हणाले.

साहित्य अकादमीने 21 भाषांमधील  लेखकांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. मुकेश थली यांच्या रंगतरंग या लेखसंग्रहाला कोकणी भाषेचा पुरस्कार मिळाला आहे. एकूण 8 काव्यसंग्रह, 3 कादंबऱ्या, 2 लघुकथा संग्रह, 3 साहित्य समीक्षक, 1 नाटक आणि एका संशोधनासाठी पुरस्कार दिला. बंगाली, डोगरी आणि उर्दू भाषेसाठीचे पुरस्कार नंतर जाहीर केले जातील, असे साहित्य अकादमीने सांगितले.

साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या लेखकांना सन्मानचिन्ह, शाल आणि एक लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाते. 8 मार्च 2025 रोजी दिल्लीत हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

साहित्य अकादमी पुरस्काराची घोषणा : सुधीर रसाळ यांच्या ‘विंदांचे गद्यरूप’ या पुस्तकाला यंदा मान 

कोणा कोणाला जाहीर झाला अकादमी पुरस्कार?
आसामी – समीर तांती, बोडो – अरोन राजा, इंग्रजी – इंस्टरिन किर, गुजराती – दिलीप झवेरी, हिंदी – गगन गिल, कन्नड – केव्ही नारायणा, काश्मिरी – सोहन कौल, कोकणी – मुकेश थाली, मैथिली – महेंद्र मलांगिया, मल्याळम – जयकुमार, मणिपुरी – हाओबम सत्यवती देवी, मराठी – सुधीर रसाळ, नेपाळी – युवा बराल, ओरिया – वैष्णव चरण समल, पंजाबी – पॉल कौर, राजस्थानी – मुकुट मणिराज, संस्कृत – दीपक कुमार शर्मा, सेंतली – महेश्वर सोरेन, सिंधी – हुंडराज बलवानी, तमिळ – एआर व्यंकटचलपथी, तेलुगू – पेनुगोंडा लक्ष्मीनारायण

कोण आहेत सुधीर रसाळ?
यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार डॉ. सुधीर रसाळ यांना त्यांच्या विंदांचे गद्यरूप या समीक्षात्मक ग्रंथासाठी जाहीर झाला आहे. मराठीतील अग्रणी समीक्षक म्हणून रसाळ यांचा लौकीक आहेत. सुधीर रसाळ हे सध्या 91 वर्षांचे असून या वयातही ते सातत्याने लेखन करतात. रसाळ हे प्रामुख्याने मराठी साहित्य क्षेत्रातील आघाडीचे समीक्षक म्हणून ओळखले जातात. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात त्यांनी मराठी विभागप्रमुख म्हणून काम पाहिले आहे.

follow us

संबंधित बातम्या