Download App

1947 मध्ये मिळालेलं हांडगं स्वातंत्र्य; महात्मा गांधींसह संपूर्ण स्वातंत्र्य चळवळीवर भिडे गुरुजींची टीका

आपल्या वक्तव्यांमुळे कायम वादाच्या केंद्रस्थानी राहणारे श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. यावेळी त्यांचे एखादे वक्तव्य नाही तर संपूर्ण भाषणच वादात सापडले आहे. या भाषणात भिडे यांनी 1947 साली मिळालेले स्वातंत्र्य हांडगे स्वातंत्र्य असल्याचे म्हणत संपूर्ण स्वातंत्र्य चळवळीवरच टीका केली. यावेळी त्यांनी महात्मा गांधींसह स्वातंत्र्य चळवळीतील इतर नेत्यांनाही लक्ष्य केलं. ते काल पिंपरी-चिंचवड येथील एका जाहीर कार्यक्रमात बोलत होते. यावेळी भाजप आमदार महेश लांडगे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Adipurush च नाही तर ‘या’ चित्रपटांनाही संवादांवरुन करावा लागला होता विरोधाचा सामना

काय म्हणाले संभाजी भिडे?

स्वातंत्र्यावर भाष्य करताना भिडे गुरुजींनी महात्मा गांधींवर निशाणा साधत टीकेची झोड उठवल्याचं पाहायला मिळाले. ते म्हणाले, स्वातंत्र्याची चळवळ सुरु असतानाच महात्मा गांधी पहिल्या दिवसापासूनच ब्रिटिशांची पाठराखण करणारे वर्तन करत आले. महात्मा गांधी म्हणायचे, आपल्याला आतापर्यंत स्वातंत्र्य मिळाले नाही कारण आपण आतापर्यंत शस्त्रास्त्रांचा मार्ग अवलंबला. पण आता आपण अहिंसेने वाटचाल करु. मी तुम्हाला एका वर्षात स्वातंत्र्य मिळवून देतो. महात्मा गांधींची स्वातंत्र्य मिळवून देतो म्हणणारी वक्तव्य म्हणजे लफंगेगिरी होती.

‘भाजप हा विषारी फणा तो ठेचणारच!; राऊतांनी सांगितलं महाविकास आघाडीतलं खरं गुपित

यासोबतच आज आपण म्हणतं असलेलं राष्ट्रगीत हे आपलं राष्ट्रगीत नसल्याचं त्यांनी खुलेआमपणे म्हटलं आहे. जन, गण, मन हे पंचम जॉर्जच्या स्वागतासाठी टागोरांना सुचलं होतं. काय लायकीचे लोकं, काय लायकीचं स्वातंत्र्य अन् काय झेंडावंदन.

1947 मध्ये मिळालेलं ते हांडगं स्वातंत्र्य :

1947  साली मिळालें स्वातंत्र्य हांडगं स्वातंत्र्य होतं, असं म्हणतं भिडे यांनी संपूर्ण स्वातंत्र्य चळवळीवरच टीका केली. ते म्हणाले, या वर्षीपासून 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन मान्य… कसं का असेना… हांडगं स्वातंत्र्य असेल पण ते पत्करलं पाहिजे. आपण शिवाजी महाराजांना मानणारे आहोत. आपण काय बुळगे नाहीत. सगळं दुरूस्त करू… बदलेली गणितं सगळी दुरूस्त करून टाकू.

15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन मानू पण फक्त दखलपात्र म्हणून :

15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिवस करा पण फक्त दखलपात्र. त्यादिवशी भगवा झेंडा घेवून, हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्य दिन पदयात्रा काढा. पुस्तक छापली आहेत, ती गावोगावी पोहचवा, सर्वांना शिकवा. ती गीत म्हणतचं स्वातंत्र्य दिन साजरा करा. तिरंगी झेंडा… तो काही तीन आणि चार मीटरचा नको. उगं काय दखलपात्र असावं, असं म्हणतं तिरंग्यासह स्वातंत्र्य दिन फक्त दखलपात्र पद्धतीने साजरा करावा, असे त्यांनी म्हंटलं.

भागानगरे हत्याकांड! तिसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

तोपर्यंत आमचं स्वतंत्र्य दुःखाचा :

15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन साजरा करतोय तो पर्यंत देशाचे तुकडे झाले म्हणून शोक पाळा, कडकडीत उपवास करायचा. जोपर्यंत दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भगवा ध्वज फडकत नाही तोपर्यंत आमचं स्वतंत्र्य दुःखाचा आहे. आमची स्वातंत्र्य लक्ष्मी मुस्लीम आणि ख्रिश्चनांच्या जनानखान्यात जोधाबाईसारखी बटकी म्हणून जगणार नाही. ती सीतेसारखी प्रतिव्रता असणार. परपुरुषाचा स्पर्श सहन होणार नाही. भगवा म्हणजे भगवाच, असा निर्धार त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

“आम्ही कुणाच्या घरात घुसत नाही; पण, घुसलोच तर…” : फडणवीसांचा ठाकरेंना इशारा

वल्लभभाई पटेल मुळचे लेवा पाटील समाजाचे अन् जळगावचे :

भिडे यांनी सरदार वल्लभभाई पटेल हे मूळचे लेवा पाटील समाजातील आणि जळगावचे होते, असा जावई शोध लावला. ते म्हणाले, राष्ट्रध्वज निर्मितीमधील कमिटी स्थापन केली. यात महात्मा गांधींनी पाच नाव घेतली. पहिलं नाव सांगितलं अब्दुल कलाम आझाद. बसा दोन्ही हातांनी बोंबलत. तुर्कस्तानचा हा भडवा. नंबर एक द्वेष्टा. दुसरे सदस्य अॅनी बेझंट. फ्रान्सची ही बाई, तिला भारताचा पुळका आला. तिसरा आणि चौथा सदस्य म्हणजे आयसीएस ऑफिसर. रग्गड कमवून बसलेले, पेन्शन घेतलेले.

पाचवे म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल. देश वाचविणारा माणूस. हे वल्लभभाई पटेल म्हणजे मूळचे जळगावमधील लेवा पाटील समाजातील होते. त्यांच्या आजोबांच्या काळात इकडे दुष्काळ पडला म्हणून ते गुजरातमध्ये स्थलांतरित झाले. तिकडेच त्यांना मुलगा झाला. कालांतराने लेवा गळून पडलं आणि पाटीलचं पटेल झालं, असं ते म्हणाले. दरम्यान, संभाजी भिडे यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यात वातावरण तापण्याची शक्यता आहे.

Tags

follow us