नाशिक : रामनवमीच्या दिवशी नाशिकमध्ये काळाराम मंदीरामध्ये कोल्हापूरच्या गादीचे वंशज आणि माजी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या पत्नी संयोगीताराजे छत्रपती काळाराम मंदीरामध्ये पूजा करण्यासाठी गेल्या असता. त्यांना तेथील पुजाऱ्यांनी वेदोक्त मंत्रांचं पठण करण्यापासून रोखले. त्यावर त्यांनी तेथे संबंधितांना समज देत वेदोक्त मंत्रांसह पूजा केली. मात्र त्यांनी त्यांच्यासोबत अशा प्रकारे झालेल्या या भेदभावा बद्दल नाराजी व्यक्त करत इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केली होती.
परंतु या सर्व प्रकरणावर स्पष्टीकरण देताना मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास यांनी सांगितले की संयोगीताराजे छत्रपती रामनवमीच्या दिवशी नाशिकला आल्याचं नव्हत्या त्या दोन महिन्यापूर्वी म्हणजे 10 फेब्रुवारीला त्या नाशिकच्या काळाराम मंदिरात आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी मला सांगितले की आम्ही छत्रपती घराण्यातील आहोत म्हणून आमचं पूजन वेदानुसार करण्यात यावं त्यावर त्यानां मी सांगितलं प्रभूरामाला कुठल्याही माणसाचा अभिषेक पूजन केल्यानंतर पुरुषसुखानेच अभिषेक केला जातो. याची रचना ऋग्वेदात आहे. त्यानुसार आपण अभिषेक करतो. त्यानंतर संयोगीताराजे छत्रपती संकल्पाला बसल्या सर्व पूजा त्यांनी केली. त्यांनी मी दिलेला प्रसाद देखील घेतला. त्यानंतर त्यांनी मला अकरा हजार रुपयांची दक्षिणा दिली.
Sugarcane Juice : उसाचा रस हा शेतीमाल नाही, लागणार 12 टक्के जीएसटी
त्यावेळी मी स्वतः त्यानां मंदिर परिसर दाखून मंदिराची माहिती सांगितली. छत्रपती संभाजीराजे भोसले यांचा दुसऱ्या दिवशी वाढदिवस होता. म्हणून त्यांनी मंदिरात येऊन रामाच्या चरणी संकल्प केला की राजेंना चांगलं आरोग्य प्राप्त व्हांव यासाठी पूजा केली.
मी त्यांचा कुठलाही अनादर केला नाही. परंतु त्यांचा काही तरी गैरसमज झाला असावा. तरी देखील मी कोल्हापूरला जाऊन छत्रपती संभाजीराजे भोसले यांची माफी मागणार आहे.