Download App

Sanjay Raut : शिवसेना नावासह धनुष्यबाणासाठी 2 हजार कोटींचा सौदा

मुंबई : शिवसेना (Shivsena)नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह दोन्हीही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला देण्यात आले. त्यानंतर ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाच्या (Election Commission)या निर्णयावर सातत्यानं टीका केली जात आहे. त्याबरोबरच नाराजीही व्यक्त केली जातेय. अशातच संजय राऊत यांनी मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप केलाय.

खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत हा आरोप केलाय. आपल्या ट्वीटमध्ये संजय राऊत यांनी म्हटलंय की, माझी खात्रीची माहिती आहे. चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आत्तापर्यंत 2000 कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले आहेत. हा प्राथमिक आकडा आहे आणि 100 टक्के सत्य आहे. बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील. देशाच्या इतिहासात असं कधीच घडलं नव्हतं.

त्याचसोबत खासदार संजय राऊत यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या काही ओळीही शेअर केल्या आहेत. त्यात ही न्यायव्यवस्था काहीकांची रखेल झाली आहे. ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली, मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे… कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली, अशा या ओळी या ट्वीटमध्ये आहेत.

Tags

follow us