मृत्यूंची थट्टा करणारे निर्लज्ज, विरोधकांना तुरुंगात टाकणारे सरकार; संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात

मुंबई भाजप अध्यक्षांनी एक जण झाड पडून मेला, तर दुसरा मॅनहोलमध्ये मेला असे म्हणत दात काढून हसण्याचा प्रकार केला.

Untitled Design 74

Untitled Design 74

Sanjay Raut launches a scathing attack on the ruling dispensation : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईतील पावसादरम्यान झालेल्या मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली. मुंबई भाजप अध्यक्षांनी या मृत्यूंबाबत केलेल्या वक्तव्यावरून त्यांनी संताप व्यक्त करत, मृत्यूंची निर्लज्जपणे थट्टा उडवली जात असल्याचा आरोप केला. संजय राऊत म्हणाले, मुंबई भाजप अध्यक्षांनी एक जण झाड पडून मेला, तर दुसरा मॅनहोलमध्ये मेला असे म्हणत दात काढून हसण्याचा प्रकार केला. हा अत्यंत असंवेदनशीलपणा आहे. भाजप हा जगातील सर्वात निर्लज्ज पक्ष असल्याचे त्यांच्या वागणुकीतून दिसून येते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा असंवेदनशील नेत्याची तात्काळ पदावरून हकालपट्टी करावी. सरकारने आवश्यक खबरदारी घेतली नसल्यामुळेच या दोघांना आपले प्राण गमवावे लागले. मुंबईतील पावसाळी परिस्थितीवर भाष्य करताना राऊत यांनी सरकारच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. गेल्या अडीच वर्षांपासून भाजपचे मुख्यमंत्री ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी बसले आहेत. 104 टक्के गटारसफाई झाल्याचा दावा केला जातो, पण प्रत्यक्षात मुंबई तुंबली आहे. माणसं आणि गाड्या पाण्यात  वाहून जात आहेत.

केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सियाचा मुजोरपणा’ कॅमेऱ्यात कैद; मीडियाकडे पाहून अश्लील हावभाव

मग गटारसफाईसाठी खर्च झालेला पैसा नेमका कोणाच्या खिशात गेला? हा कोणाचा कमिशनचा खेळ आहे? या लोकांनी मुंबई महानगरपालिका तर लुटलीच, पण राम मंदिरही लुटण्यास मागे-पुढे पाहिले नाही, असा आरोप त्यांनी केला. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जामदार यांनी, नागरिकांना सरकारचे गुलाम बनवले जात आहे आणि विरोध केल्यास गुन्हे दाखल केले जात आहेत, अशी केलेली तोंडी टिप्पणीही राऊत यांनी स्वागतार्ह असल्याचे म्हटले. ते म्हणाले, हे ऐकल्यानंतर

रोमांचित झालो. देशात अजूनही कोणाचा तरी आत्मा जागा आहे आणि कोणीतरी डोळे उघडे ठेवून परखडपणे सत्य मांडत आहे. अशा लोकांमुळेच देशाची राज्यघटना टिकून राहील. पुढे बोलताना त्यांनी म्हटले, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात घोषणा दिल्या म्हणून जर कोणाला तडीपार केले जात असेल, तर देशात लोकशाही शिल्लक राहिली आहे असे म्हणता येणार नाही. विरोधकांचा आवाज दाबणे आणि सत्तेवर टीका करणाऱ्यांना तुरुंगात टाकणे, हेच सध्या सुरू आहे.

आंबेगाव येथे बिबट्याच्या दहशतीविरोधात झालेल्या सर्वपक्षीय आंदोलनाचा दाखला देत राऊत यांनी सरकारवर पक्षपाती कारवाईचा आरोप केला. ते म्हणाले, त्या आंदोलनात भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या सर्व पक्षांचे एक हजार ते बारा शंभर कार्यकर्ते सहभागी झाले होते. तो सामाजिक प्रश्न होता. मात्र, गुन्हे केवळ आमच्याच कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आले. दिलीप वळसे पाटील यांच्या सांगण्यावरून पक्ष पाहून कारवाई करण्यात आली. घोटाळेबाजांना पक्षात घ्यायचं आणि विरोधकांना तुरुंगात डांबायचं, हाच सध्याच्या सरकारचा एककलमी कार्यक्रम आहे.

Exit mobile version