Download App

राऊतांच्या ‘नरकारतला स्वर्ग’ची भाजपमध्येही हवा; अरे व्वा! म्हणत सांगितले भाजप आमदारांचे फोन…

  • Written By: Last Updated:

BJP MLA Fan Of UBT Sanjay Raut Book : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नुकत्याच प्रकाशित झालेल्या त्यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकात अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. त्यांच्या या पुस्तकावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना विचारले असता मी बालवाङ्मय वाचत नसल्याची खोचक टिप्पणी फडणवीसांनी केली होती. मात्र, एकीकडे भाजपमधील काही नेते राऊतांच्या पुस्तकाची खिल्ली उडवत असतान दुसरीकडे याच भाजपमधील (BJP MLA) अनेक आमदारांना राऊतांच्या पुस्तकाची भुरळ पडली आहे. याबाबत स्वतः राऊतांनी राज ठाकरेंचे खास शिलेदार संदीप देशपांडे यांचा फोटो एक्सवर भाजपमधील किती आमदारांचे फोन आले याबाबत खउलासा केला आहे.

दर चितळे अन् काका हलवाईचे मात्र…; शेट्टींनी बाहेर काढला सुपेकर अन् गुप्तांचा ‘काजू कतली’ कांड

राऊतांची एक्स पोस्ट काय? 

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी त्यांच्या एक्सवर राऊतांचे ‘नरकातला स्वर्ग’ पुस्तक वाचत असल्याचा फोटो पोस्ट केला होता. त्यावर लपवण्यासारखं काही नाही अशी कॅप्शनही देशपांडे यांनी दिली आहे. देशपांडेंची हीच पोस्ट राऊतांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून पुन्हा शेअर करत त्यावर अरे व्वा!! हे पुस्तक सगळ्यांसाठी आहे! अशी कॅप्शन दिली आहे. आता राऊत हातात आलेली संधी सोडतील अन् बाण सोडणार नाही असं कसं होईल नाही का? याच पोस्टमध्ये राऊत पुढे म्हणतात की, आतापर्यंत मला २७ भाजपा आमदारांचे फ़ोन आले; नरकातला स्वर्ग एका बैठकीत वाचून काढले हे सांगण्यासाठी!. आता हे भाजप आमदार कोण याचा जरी उल्लेख राऊतांनी (Sanjay Raut) त्यांच्या पोस्टमध्ये केलेला नसला तरी, भाजपमध्येही राऊतांच्या नरकातला स्वर्गची हवा असल्याचे राऊतांनी दिलेल्या भाजप आमदारांच्या आकडेवारीवरून अधोरेखित होत आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.

राज ठाकरेंपासून ते फडणवीसांना पाठवले पुस्तक

राऊत यांनी त्यांचे पुस्तक मनसे अध्यक्ष राज ठाकरेंपासून ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत अनेकांना पाठवले आहे. याबाबत त्यांनी एक्सवर पोस्टही केली आहे, एकनाथ शिंदेंना पाठवलेल्या पत्रकात त्यांनी माझे एकेकाळचे मित्र व त्याच काळातील शिवसेनेतील सहकारी एकनाथ शिंदे यांना “ नरकातला स्वर्ग “ या पुस्तकाची प्रत पाठवली. शिंदे व सुरत गौहाटीला गेलेल्या त्यांच्या सर्व मंडळीनी हे पुस्तक जरूर वाचावे असा सल्लाही राऊतांनी दिला आहे.

ठाकरे-मनसे एकत्र येण्याचे ठोस संकेत

एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतानाच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राऊतांचं पुस्तक वाचत असतानाचा फोटो पोस्ट केला आहे. यामुळे आगामी काळात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याचे हे ठोस संकेत तर, नाही ना? अशी चर्चा यामुळे राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. तर, दुसरीकडे देशपांडे यांनी मी पुस्तक विकत घेऊन वाचणार नाही, मी असे आधी म्हंटले होते की, ईडीने काय चौकशी केली ते लिहायला हवं होतं, नेमके पुस्तकात काय आहे? ते वाचेल आणि अभिप्राय कळवेल असे म्हटले होते.. सध्या मी पुस्तक वाचतोय यात लपून वाचण्यासारखे काय कारण? म्हणून मी तसे कॅप्शन लिहिलेले आहे. पुस्तक विकत घेऊन वाचले तर, ते खरा अभिप्राय देता येतो. जर पुस्तक भेट म्हणून आले तर, खरं बोलता येत नाही, असेही देशपांडे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

follow us